टीम मंगळवेढा टाइम्स ।
नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीने महाविकासआघाडीला धक्का दिला. या 11 जागांपैकी महायुतीचे 9 उमेदवार निवडून आले तर महाविकास आघाडीच्या 2 उमेदवारांना यश मिळालं.
विधान परिषदेच्या या निवडणुकीत ज्या पद्धतीने शहकाटशहाचं राजकारण झालं ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. ज्याला आमदारांची आकडेमोड जमते तोच विधान परिषदेवर राज्य करतो,
हे या निवडणुकीवरून पुन्हा एकदा सिद्ध झालं. विधान परिषदेच्या या निवडणुकीनंतर आता राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 12 आमदारांची लवकरच वर्णी लागणार असल्याचं बोललं जात आहे.
याकरता राज्य सरकारने पावलं उचलली असून ही नावं लवकरच जाहीर केली जाणार आहेत. ऑगस्ट महिन्याच्या मध्यावधीमध्ये या 12 आमदारांच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते.
गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या विधान परिषदेत अगदी थोड्याच आमदारांसह कामकाज सुरू आहे. असं असताना नुकत्याच झालेल्या 11 जागांकरिता निवडणुकीतून 11 आमदार विधानपरिषद आलेत तर आता राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची देखील लवकरच विधान परिषदेमध्ये वर्णी लागेल.
याकरता राज्य सरकारने पावले उचलली आहेत. हे गणित विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलं जात आहे, असं म्हटलं तरी वागव ठरणार नाही. कारण विधानसभा जितकी महत्त्वाची आहे, विधानसभेतील संख्याबळ जितकं महत्त्वाचं आहे
तितकच संख्याबळ आणि तितकंच महत्त्व किंबहुना त्याहीपेक्षा जास्त महत्व हे विधान परिषदेला आहे, हे सत्ताधाऱ्यांना कळून चुकलंय, यामुळेच आता विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची लवकरच नियुक्ती केली जाईल, या हालचालींना वेग आलाय.
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांकरता महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती महायुतीतील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. यानुसार भाजप 4, शिवसेना 2, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट 2 आणि उर्वरित 4 हे राज्यातील नामवंत तज्ज्ञ असतील, असं सांगतिलं जात आहे.
नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या 11 आमदारांच्या निवडणुकीप्रमाणे याही राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत महायुतीतील काही राजकीय नेत्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाणार असल्याचंदेखील बोललं जात आहे.
शिवसेनेचा विचार केला तर एका महिला आमदाराचे पुनर्वसन केले जाणार असून शिवसेना पक्षातील एका पदाधिकाऱ्याची देखील वर्णी लागणार असल्याचं बोललं जात आहे.
या 12 आमदारांच्या नियुक्ती आधीच राज्यात राज्यपाल रमेश बैस यांचा कार्यकाळ संपत असून पहिले राज्यपाल रमेश बैस यांचा कार्यकाळ वाढवला जाईल किंवा त्यांच्या जागी नवीन राज्यपालांची नियुक्ती केली जाईल आणि यानंतरच राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा निकाल लावला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातून माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नावाची चर्चा सुरू असून याबाबत लवकर वरीष्ठ पातळीवरून नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज