टीम मंगळवेढा टाईम्स ।
मी विधानसभा निवडणूक लढवणार हे पक्के आहे. मात्र मतदारसंघ माढा की पंढरपूर-मंगळवेढा हे निश्चित नाही. पक्षही निश्चित नाही. पण विधानसभेची निवडणूक नक्की लढवणार आणि ती जिंकणारही, असे वक्तव्य विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी केले.
शरद पवार गटात जर भगीरथ भालके आले तर योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. भालके बऱ्याच पक्षात जाऊन आलेत. भालकेंना पक्षात जाऊन अनुभव घेण्याची वेळ आहे. आपण ज्या-त्या परिस्थितीत राजकीय निर्णय घेऊ, असे वक्तव्य अभिजित पाटील यांनी रविवारी उंदरगाव (ता. माढा) तालुक्यातील उंदरगाव येथे आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पत्रकारांशी पाटील यांना भगीरथ भालके यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अभिजित पाटील यांच्या विचारले असता. भेटीविषयी शरद पवारांना अनेक जण भेटतात. मात्र पवारांचा अंदाज यायला बराच वेळ लागतो.
इतक्या लवकर पवारांचा अंदाज कळणार नाही. भालके बऱ्याच पक्षात जाऊन आलेत. भालकेंना पक्षात जाऊन अनुभव घेण्याची सवय आहे. मी विधानसभा निवडणूक लढवणार आहे.
आमचे निवडणुक लढवण्याचे पक्के आहे. मी जनसंपर्कात आहे. विधानसभेची निवडणुकीची तयारी केलीय. आणि निवडणूक मी जिंकणार. माढा की पंढरपूर हे जिथे जास्त प्रतिसाद मिळून येईल तिथून उभा राहण्याचे ठरवणार आहे.
विधानसभेत निवडूण येणे हेच माझे ध्येय आहे. लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटील फॅक्टर चालला असून, विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने निकाली काढावा.
यावेळी श्री विठ्ठल कारखान्याचे संचालक दत्तात्रय नरसाळे, हृषीकेश तांबिले, दिगंबर फाळके, विशाल मस्के, नागेश गायकवाड उपस्थित होते.
कारखाना चालला पाहिजे म्हणून लोकसभेवेळी भाजपला बाहेरून पाठिंबा
विठ्ठल कारखाना चालला पाहिजे आणि शेतकरी जगला पाहिजे. याच उद्देशाने लोकसभा निवडणुकीत भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता. कारखान्यासमोरील अडचणी सोडवण्यासाठी केवळ लोकसभा निवडणुकीपुरता मी महायुतीबरोबर होतो, असे सांगितले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पर्याय खुले असल्याचे संकेतच त्यांनी दिले.
माझे गाव व १४ संचालक माढा मतदारसंघात
माझ्या कारखान्याचे चौदा संचालक माढा विधानसभा मतदारसंघातील गावातील असून, माझे स्वतःचे गाव देगाव हे माढा विधानसभा मतदारसंघात आहे, असे सांगत माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेतही पाटील यांनी दिले. त्यामुळे पंढरपूर विधानसभेबरोबरच माढ्याचा पर्याय त्यांच्यापुढे आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज