mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा। ‘या’ ग्रामपंचायतीचे 9 सदस्य अपात्रतेच्या फेऱ्यात? दोन गटात राजकीय घमासान

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 20, 2022
in मंगळवेढा
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा तालुक्यातील मरवडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सचिन घुले यांच्यासह सत्ताधारी गटाच्या पाच तर विरोधी स्वाभिमानी गटाचे प्रमुख संजय पवार यांच्यासह चार सदस्यांविरोधात निवडणूक खर्च विहीत पद्धतीने व नमुन्यात सादर न केल्यामुळे संबंधित सदस्यांना अपात्र करणेबाबत परस्पर विरोधात तक्रारी दाखल झाल्याने

त्या 9 सदस्यांवर कुठली कारवाई होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले असून पवार व तांबोळी गटातील राजकीय स्पर्धा यानिमित्ताने टिपेस पोहोचली आहे.

मागील पंचवार्षिक कालावधीत केलेल्या विकास कामांच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित भालके गटाच्या स्वाभिमानी परिवाराचे प्रमुख संजय पवार यांची राजकीय घौडदौड रोखण्यासाठी तालुक्याच्या राजकीय पटलावरील

परिचारक, काळुंगे, ढोबळे,शेतकरी संघटना तसेच स्थानिक लतिफ तांबोळी गटाने एकत्र येत गावविकास आघाडीच्या माध्यमातून बहुमत मिळवले होते.

या निवडणूकीतील सत्ताधारी गटाच्या सरपंच, उपसरपंच यांच्यासह अन्य तीन सदस्यांनी विहीत रीत व नमुन्यात खर्च सादर केला नसल्याची तक्रार युवा आघाडीचे कार्यकर्ते बालाजी पवार यांनी दाखल केली होती.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडावी या हेतूने राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या संहितेप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल करताना उघडण्यात आलेल्या बँक खात्यावरुन निवडणूक खर्च करणे बंधनकारक असताना या नियमांचे उल्लंघन झाले असून या पाच सदस्यांनी रोखीने खर्च केल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आहे.

या तक्रारीच्या अनुषंगाने सोशल मिडीयातून अनेकदा कलगीतुरा रंगला होता. या तक्रारीमुळे गावच्या निकोप राजकीय परंपरेला तडा जात असून पराभव पचवता न आल्याने अशा तक्रारी केल्याचा आरोप सत्ताधारी गावविकास आघाडीने केला होता,

तर २०१२ मध्ये तिसऱ्या आघाडीच्या सदस्यांना अपात्र करण्यासंदर्भात लतिफभाई तांबोळी यांनी तक्रार दाखल करुन ही सुरुवात करुन दिल्याची आठवण विरोधकांनी त्यांना करुन दिली होती.

या संदर्भात सरपंच सचिन घुले यांनी गावची प्रगल्भ राजकीय परंपरा विरोधक पायदळी तुडवत असून मिळेल तेवढया कालावधीत चांगले काम करणार असून आमच्या विरोधात तक्रारी झाल्या असल्या तरीही आम्ही विरोधकांवर अशा कुठल्याही हरकती घेणार नसल्याचा निर्वाळा दिला होता.

सत्ताधारी गटाच्या पाच सदस्यांविरोधातील सुनावणी 7 डिसेंबर रोजी पूर्ण झाली असून जिल्हाधिकार्यांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते .

मात्र सत्ताधारी गावविकास आघाडीचे मिस्टर उपसरपंच सिद्धेश्वर सुर्यवंशी यांनी विरोधी स्वाभिमानी गटाच्या चार सदस्यांविरोधात देखील अशीच तक्रार दाखल केल्याने सुरुवातीला तक्रारीकडे टाईमपास हिणवणार्यांना देखील या हरकतीचे गांभीर्य लक्षात आल्यामुळे ही तक्रार दाखल झाल्याची चर्चा गावात रंगली आहे.

या संदर्भातील पहिली सुनावणी नुकतीच झाली असून पुढे होणाऱ्या सुनावण्यांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या सर्व घडामोडीमुळे उपसरपंचपदी सौ.रेश्मा शिवशरण यांची वर्णी लागली असून सरपंच सचिन घुले यांनीही आपल्या पदाचा राजीनामा सभापती सौ.प्रेरणा मासाळ यांच्याकडे सुपुर्द केला असून आगामी घडामोडींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

यानिमित्ताने राष्ट्रवादी ओ.बी.सी. सेलचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी लतिफभाई तांबोळी यांच्या राजकीय संपर्काचा कस लागला असून गावविकास आघाडीच्या सदस्यांना तांबोळी यांच्यासह भाजपाची मोठी राजकीय ताकद मिळत आहे.

तर राष्ट्रवादीचेच जनरल सेक्रेटरी संजय पवार हे प्रतिकूल राजकीय परिस्थितीत प्रशासकीय कौशल्याच्या बळावर बाजी पलटविण्यात माहीर असून त्यांच्या देखील नैपुण्याचा कस लागला आहे.

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार – तांबोळी गटातील हे राजकीय शीतयुद्ध हुलजंती गटातील अनेक समिकरणांची नांदी ठरणार यात शंका नाही.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मरवडे ग्रामपंचायत

संबंधित बातम्या

राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

साप चावला तर जबाबदार कोण? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ शाळेतील धोकादायक इमारतीच्या अवशेषांवरून पालकांचा प्रशासनाला थेट सवाल

August 30, 2026
धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

August 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राखी पौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला: बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेलेल्या भावाचा भीषण अपघातात मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

August 29, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 30, 2026
Next Post
मंगळवेढ्यातील दुकानाची वेळ आजपासून ‘ही’ असणार, ‘या’ नियमांचे असणार बंधन

मंगळवेढ्यातील 'या' चौकास भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर असे नाव देण्याची मागणी

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

August 31, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

August 31, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा