mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मुजोर कम॔चारी, नियोजन शून्य कारभारामुळे कडलासमध्ये पाणी टंचाईच्या झळा ; ग्रामविकास अधिका-यासह गावपुढा-याचे दुर्लक्ष

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मुजोर कम॔चारी, नियोजन शून्य कारभारामुळे कडलासमध्ये पाणी टंचाईच्या झळा ; ग्रामविकास अधिका-यासह गावपुढा-याचे दुर्लक्ष

टीम मंगळवेढा टाईम्स । कडलास (ता.सांगोला) येथील ग्रामपंचायतीचे मुजोर कम॔चारी आणि नियोजन शून्य कारभारामुळे कडलास गावासह वाड्या वस्त्यावरील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. पाच-सहा दिवसातुन एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. विशेषतः नव्याने विहिर खोदाई आणि पाणी पुरवठ्यावर लाखो रुपये खच॔ करुनही गावाला पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली आहे. याकडे ग्रामविकास अधिका-यासह लोकप्रतिनिधीचे दुल॔क्ष झाले आहे.

सध्या उन्हाळ्याच्या झळा तीव्र झाल्या असून, हंडाभर पाण्यासाठीही जीवाचे रान करावे लागत आहे. विशेषतः गावातील अनेक भागात  पाण्याची समस्या तीव्र झाली आहे. काही महिन्यांपूर्वी माणनदीत मुबलक पाणीसाठा उपलब्ध होता, तरीही पाणी टंंचाई कायम आहे. गावातील नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात हंडाभर पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. दुर्दैवाने पाणीटंचाई कायमची दूर व्हावी, यासाठी ग्रामपंचायतीने नव्याने विहिर खोदली पण तो खच॔ देखील पाण्यात गेला आहे. ती विहिर देखील कोरडी ठणठणीत पडली आहे.

गावच्या वाड्यावस्त्यांवरील जनतेला पिण्याच्या पाण्याची समस्या ही पाचवीलाच पुजलेली आहे. उन्हाळा असो की पावसाळा पाणी टंचाई कायम आहे. तर उन्हाळा सुरू झाला कित्येक भागातील पाण्याचे स्रोत आटू लागतात. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागते अथवा टँकरवर अवलंबून राहावे लागते. नैसर्गिक पाण्याचे स्रोत कमीच आहेत. त्यामुळे गावांमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरातील वाड्यावस्त्यांवर पाण्याची टंचाई तीव्रतेने जाणवू लागलेली आहे.

दरम्यान, कडलास ग्रामपंचायतीच्या दोन विहीरी असूनही गावासह वाड्या वस्त्यावरील नागरिकांना रोटेशननुसार पाच ते सहा दिवसातुन एकदा पाणी पुरवठा केला जातो. तसेच अनेकदा पाणी पुरवठाचा खोळंबा झाल्यावर कोणतेही नियोजन केले जात नाही. याचा फटका गावक-याना बसू लागला आहे. यामध्ये ग्रामपंचायत कम॔चा-याचा निष्काळजी व मुजोरपणा, नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.

सध्यस्थितीत ग्रामपंचायतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी घेण्यास पञ दिले आहे. परंतु ग्रामपंचायतीचा हा कारभार म्हणजे तहान लागल्यावर विहिर खोदण्याचा प्रकार आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करुन सुरळीत करावा,अशी मागणी नागरिकांतुन होवु लागली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
ठाकरे सरकार । महाराष्ट्रात आतापर्यंत २८ लाख ३७ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप

ठाकरे सरकार । महाराष्ट्रात आतापर्यंत २८ लाख ३७ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 15, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 15, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांची दहशत; खुनाचा बनाव रचून शेतकऱ्याचे दागिने लंपास; एकाच दिवशी दोन घटनांनी खळबळ

September 14, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावच्या कारभाऱ्यांची गळचेपी? राज्य सरकारच्या निर्णयाने सरपंचपदावर कुऱ्हाड; ‘त्या’ अटीविरोधात सरपंच महासंघ सुप्रीम कोर्टात जाणार

September 15, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा