mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खासदार जयसिध्देश्वर महाराजांवरती खोटे प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
खासदार जयसिध्देश्वर महाराजांवरती खोटे प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । जात पडताळणी समितीने भाजपचे खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले. समितीच्या आदेशानुसार अक्‍कलकोट तहसिलदारांनी सोलापूर न्यायालयात डॉ. महास्वामींविरुध्द फिर्याद दिली. त्यावर बुधवारी (ता. 4) सुनावणी पार पडली. त्यानुसार सदर बझार पोलिसांनी डॉ. महास्वामींविरुध्द गुन्हा नोंद करुन जात प्रमाणपत्राबाबतचा चौकशी अहवाल न्यायालयास सादर करावा, असे आदेश दिले. पुढील सुनावणी 27 एप्रिलला होणार आहे.

लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना डॉ. महास्वामी यांनी दिलेले जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आक्षेप घेत मिलिंद मुळे, प्रमोद गायकवाड यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जात पडताळणी समितीसमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली.

जात पडताळणी समितीने नियुक्‍त केलेल्या दक्षता पथकाने डॉ. महास्वामी यांनी दिलेले पुरावे बनावट असल्याचा अहवाल पडताळणी समितीला दिले. त्यानुसार पडताळणी समितीने डॉ. महास्वामी यांना मूळ जात प्रमाणपत्र देण्याची मागणी केली. मात्र, समितीला शेवटपर्यंत मूळ प्रमाणपत्र मिळाले नाही. सुनावणीच्या शेवटच्या दिवशी दाखला गहाळ झाल्याची फिर्याद वळसंग पोलिस ठाण्यात नोंदविल्याची प्रत पडताळणी समितीला देण्यात आली. दरम्यान, समितीने डॉ. महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले. 

न्यायालयाने दिला असा आदेश

अक्‍कलकोट तहसिलदारांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदर बझार पोलिसांनी खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांच्याविरुध्द 156/3 प्रमाणे गुन्हा नोंद करावा. तहसिलदारांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करुन त्याचा अहवाल न्यायालयास सादर करावा, असे आदेश सोलापूर न्यायालयाने बुधवारी (ता. 4) दिले. फिर्यादी सुनावणीवेळी गैरहजर असल्याचे न्यायालयाने निकालात नमूद केले. या प्रकरणी पुढील सुनावणी 27 एप्रिलला होणार असल्याची माहिती तक्रारदार प्रमोद गायकवाड यांनी दिली.

जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
कोरोनामुळे पंढरीच्या विठ्ठल मंदिरात दिवसातून सात वेळा साफसफाई

कोरोनामुळे पंढरीच्या विठ्ठल मंदिरात दिवसातून सात वेळा साफसफाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सामाजिक भान! सिद्धनाथ सलगर यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्यांना खाऊ वाटप; आज विविध शाळांमध्ये उपक्रमाचे आयोजन

सामाजिक भान! सिद्धनाथ सलगर यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्यांना खाऊ वाटप; आज विविध शाळांमध्ये उपक्रमाचे आयोजन

August 12, 2026
मुस्लिम जमियत मंगळवेढयाच्या ‘चेज रिपोर्ट’ प्रस्तावाला वक्फ मंडळाची मंजुरी; नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर; इम्रान काझी उपाध्यक्ष

मुस्लिम जमियत मंगळवेढयाच्या ‘चेज रिपोर्ट’ प्रस्तावाला वक्फ मंडळाची मंजुरी; नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर; इम्रान काझी उपाध्यक्ष

August 11, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

​दारू प्याल तर १० हजारांचा भुर्दंड; ग्रामसभेत ग्रामस्थांचा एकमताने ऐतिहासिक ठराव; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावाचा धाडसी निर्णय; गावात दारूबंदीसाठी कडक नियमावली लागू

August 11, 2026
​मंगळवेढेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद! ‘दामाजी सिटी’मध्ये अवघे मोजकेच प्लॉट्स शिल्लक; खरेदीसाठी ‘दामाजी सिटी’ ठरतेय नागरिकांची पहिली पसंती

​मंगळवेढेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद! ‘दामाजी सिटी’मध्ये अवघे मोजकेच प्लॉट्स शिल्लक; खरेदीसाठी ‘दामाजी सिटी’ ठरतेय नागरिकांची पहिली पसंती

August 11, 2026
मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी

मंगळवेढा पोलिसांना संभाजी ब्रिगेडचे थेट आव्हान; अवैध धंदे रोखा, नाहीतर १५ ऑगस्टला आमरण उपोषण

August 11, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आंबोलीच्या धबधब्याखाली आनंद लुटत होते, अचानक गडागडा लोळायला लागले; तोंडातून फेस, पर्यटकाचा मृत्यू

August 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा