सुरज फुगारे । राज्यात मान्सून दाखल होऊन दोन दिवस झाले तरी किनारपट्टीवर मात्र त्याची फारशी प्रगती दिसली नाही.त्यामुळे मुंबईकरांना मान्सून कोकणातच रेंगाळणार अशी चिंता वाटत होती.(Monsoon strikes Mumbai at any moment)
मात्र शनिवारी संध्याकाळी उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावली . त्यानंतर ढगांचा गडगडाट आणि विजाही चमकल्या आणि मुंबईकरांना मान्सूनच्या आगमनाची चाहूल मिळाली. भारतीय हवामान विभागाने रविवारी मुंबईमध्ये मान्सून दाखल होईल,असा अंदाज वर्तवला आहे.
या अंदाजाला बळकटी देत ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाट झाल्याने मुंबईकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी मान्सूनने मध्य महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भाचाही बराचसा भाग व्यापला.
रविवारी मुंबईसह उर्वरित भागामध्ये मान्सून दाखल होऊ शकतो , अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज