mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापुरात शासकीय जमीन हडप करणार्‍या माजी महापौरासह दोघांवर गुन्हा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 22, 2021
in क्राईम, सोलापूर
संतापजनक! मंगळवेढ्यात जन्मदात्या आईनेच केला मुलीचा खून

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर महापालिकेच्या ताब्यात असलेली कोट्यवधींची जमीन महापौरपदाचा गैरवापर करून हडप केल्याप्रकरणी माजी महापौरासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

माजी महापौर मनोहर गणपत सपाटे (रा. हॉटेल शिवपार्वती, लकी चौक) व लता सुदाम जाधव (रा. सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी योगेश नागनाथ पवार (वय 27, रा. अभिषेक पार्क, धुम्मा वस्ती, लक्ष्मी पेठ) यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, 20 मार्च 1993 ते 20 मार्च 1994 या कालावधीत मनाहेर सपाटे हे सोलापूर महानगरपालिकेचे महापौर होते. सपाटे हे सन 1991 पासून ते आजतागायत यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.

या संस्थेला अभिषेकनगर, मुरारजी पेठ येथील टीपी-4, फायनल प्लॉट नं. 106, क्षेत्र 7863 चौ.मी. ही जागा स्वत: अध्यक्ष असलेल्या संस्थेला देण्यासाठी शासनाच्या आदर्श नियमांचा भंग केला.

20 जुलै 1993 रोजी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेतील ठराव क्र. 172 अन्वये बेकायदेशीरपणे शैक्षणिक वापर करण्यासाठी संस्थेस जागा देण्याचा ठराव मंजूर करून घेतला. त्यावेळी ती मिळकत जमीन ही महानगरपालिकेच्या नावे किंवा प्रत्यक्ष कब्जेवहिवाटीस नव्हती.

त्यावेळी त्या मिळकतीबाबत मुंबई उच्च न्यायालयात दावा चालू होता. याबाबत मनोहर सपाटे यांना पूर्ण माहिती असूनसुद्धा सपाटे यांनी महापौरपदाचा गैरवापर स्वत:च्या हितासाठी केला.

प्रशासनावर दबाव टाकून श्री यशवंत शिक्षण प्रसारक या संस्थेच्या शाळेला शैक्षणिक मान्यता मिळाली नसतानाही संस्थेला फायदा होण्यासाठी ठराव मंजूर करून घेतला. हा ठराव मंजूर झाल्यानंतर शाळा मान्यतेसाठी महाराष्ट्र शासनाकडील शिक्षण व सेवायोजना विभागाकडे 19 एप्रिल 1994 रोजी लेखी अर्ज केला.

त्यानंतर 10 जानेवारी 1995 रोजी या संस्थेस शाळेची मंजुरी मिळाली. त्यानंतर उच्च न्यायालयाने ही मिळकत 24 जानेवारी 1995 रोजी महानगरपालिकेच्या ताब्यात दिली. त्यावेळी त्या मिळकतीची किंमत ही 15 कोटी रूपये होती.

संस्थेची आर्थिक परिस्थिती नसल्याने मनोहर सपाटे यांनी महापौरपदाचा गैरवापर करून या जमिनीचे शासकीय किंमतीनुसार जमिनीचे पैसे भरण्याचे मान्य केले. मात्र 3 लाख 75 हजार इतकी रक्कम न भरता खोटा पावती क्रमांक 74605 दाखविला आणि 26 जुलै 1995 रोजी खरेदीदस्त अन्वये खरेदी केली.

ही जागा खरेदी करताना संस्थेचे सदस्य नसताना खरेदीखतावर संस्थेचे सचिव म्हणून लता जाधव यांनी सही करून मनोहर सपाटे यांच्या गैरकारभारात मदत केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याचा पुढील तपास अँटिकरप्शन ब्युरोच्या पोलिस निरीक्षक कविता मुसळे या करत आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 9, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
Next Post
विद्यार्थ्यांनो! दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

दहावीच्या परीक्षेच्या निकालानंतर आता 5 वी आणि 8 वीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 9, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..