mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

स्क्रीनवर लाखो फॉलोअर्स, पण खऱ्या आयुष्यात नरकयातना! रिल स्टार रोहिणी पाराध्येच्या मृत्यूचा खरा विलन अखेर समोर; मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 20, 2026
in क्राईम, मंगळवेढा, राज्य, सोलापूर
‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग। 

सोशल मीडियावर आपल्या रिल्सने लाखो मनांवर राज्य करणाऱ्या ब्रह्मपुरीच्या रिल स्टार रोहिणी पाराध्ये हिच्या मृत्यूला अखेर २३ दिवसांनंतर वाचा फुटली आहे! जिने नेहमी पडद्यावर हसू विकलं, तिच्या वाट्याला प्रत्यक्ष आयुष्यात मात्र पतीकडून मिळालेला छळ आणि क्रूरता आली

पतीच्या सततच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून रोहिणीने मृत्यूला कवटाळल्याचे आता उघड झाले असून, मंगळवेढा पोलिसांनी पती निलेश विलास पाराध्ये याच्याविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

​सोशल मीडियावरील लाखो फॉलोअर्स आणि कुटुंबियांच्या तीव्र संतापानंतर अखेर पोलिसांना या प्रकरणाची दखल घ्यावी लागली असून, रोहिणीला हाच खरा न्याय असल्याची भावना व्यक्त होत आहे.

​जबरदस्तीने हॉटेलमध्ये काम आणि रोजचा छळ!

​मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, २६ मे रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास ब्रह्मपुरी हद्दीतील ग्रामपंचायत हॉटेलमध्ये २५ वर्षीय रोहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुरुवातीला या आत्महत्येभोवती गूढ निर्माण झाले होते. मात्र, पडदा उघडला तो एका छळवणुकीच्या कहाणीवरून

​मयत रोहिणी हिची अजिबात इच्छा नसतानाही, तिचा पती निलेश पाराध्ये हा गेल्या एक वर्षापासून तिला हॉटेलमध्ये जबरदस्तीने काम करण्यास भाग पाडत होता. केवळ एवढ्यावरच न थांबता, घरगुती कारणावरून रोज वाद घालणे, भांडणे करणे आणि अधूनमधून तिला अमानुषपणे हाताने मारहाण करणे असा तिचा छळ सुरू होता.

​त्या ‘काळ्या दिवसाचा‘ थरार…

​पतीकडून मिळणाऱ्या रोजच्याच शारीरिक आणि मानसिक त्रासाची सीमा संपली. या छळाला पूर्णपणे कंटाळून अखेर रोहिणीने टोकाचे पाऊल उचलले. तिने हॉटेलमधील राहत्या खोलीचा दरवाजा आतून बंद केला आणि खोलीतील पत्र्याच्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास लावून आपले जीवन संपवले. सोशल मीडियावर लाखो जणांना खिळवून ठेवणाऱ्या एका चेहऱ्याचा असा वेदनादायक अंत झाला.

​पोलिसांचा चक्रव्यूह आणि पित्याची फिर्याद

​आत्महत्येनंतर सोशल मीडियावरून ‘रोहिणीने आत्महत्या का केली?’ असा प्रश्नांचा भडिमार सुरू होता. पोलिसांनी तपासासाठी सी.डी.आर. (CDR) काढला, पण त्यातून ठोस काही हाती येत नव्हते. अखेर, पोटच्या मुलीचा छळ उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या हताश पित्याने पुढे येत पोलिसात धाव घेतली.

​मयत रोहिणीचे वडील बाळू गिरजाप्पा शिवशरण (रा. अर्धनारी) यांनी दिलेल्या अत्यंत करुण आणि आक्रमक फिर्यादीवरून मंगळवेढा पोलिसांनी आरोपी पती निलेश पाराध्ये याच्याविरुद्ध BNS १०८, ११५(२), ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

​तपासाची चक्रे फिरली!

“२३ दिवस उलटले तरी न्याय का मिळत नाही?” असा संतप्त सवाल विचारला जात असतानाच, आता गुन्हा दाखल झाल्याने ब्रह्मपुरी आणि सोशल मीडिया विश्वातून समाधान व्यक्त होत आहे.

‘हीच रोहिणीला खरी भावपूर्ण श्रद्धांजली’ अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणाचा पुढील धडक तपास पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर हे करत असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: रोहिणी पाराध्ये

संबंधित बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मुलीचा संसार वाचवण्यासाठी सासू सरसावली; जावयाला किडनी दान करून दिले नवजीवन

August 4, 2026

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 4, 2026

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा! जबरदस्तीने धर्मांतरासाठी आता सात वर्षे कारावास; धर्मांतरविरोधी कायदा राज्यात लागू

August 4, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट! बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाचे ४३ हजार लांबवले; मंगळवेढा बसस्थानकावरील CCTV कॅमेरे पडले बिनकामी

August 1, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 2, 2026
गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
Next Post
मोठी बातमी! धैर्यशील मोहिते पाटलांनी दिला भाजपा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा; भाजपाची मोठी डोकेदुखी वाढणार

अदृश्य शक्तीनं आम्हाला साथ दिली, दुष्काळात 'वसंत' बहरेल; धैर्यशील मोहिते पाटलांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मुलीचा संसार वाचवण्यासाठी सासू सरसावली; जावयाला किडनी दान करून दिले नवजीवन

August 4, 2026

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 4, 2026

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा! जबरदस्तीने धर्मांतरासाठी आता सात वर्षे कारावास; धर्मांतरविरोधी कायदा राज्यात लागू

August 4, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..