टीम मंगळवेढा टाईम्स ।
सगळ्याच आमदारांना मराठ्यांनी निवडून दिलं आहे. ओबीसींच्या आमदारांना देखील मराठ्यांनी निवडून दिलं आहे. त्यामुळं सगळ्यांनाच मराठा आरक्षणाचा विषय मांडावा लागेल असे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले.
नसेल तर आमदारांना पुन्हा त्या मतदारसंघात जायचं आहे, त्यामुळं त्याचे परिणाम वाईट होतील असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर पुढचं सामुहिक उपोषण होणार आहे. ते उपोषण अंतरवाली सराटीत होईल किंवा मुंबईतही होऊ शकतं असे जरांगे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री कोणीही झाले तर आरक्षण मात्र घेणारच
राजकारण हे आमचं क्षेत्र नाही. मुख्यमंत्री कोणीही झाले तर आरक्षण मात्र घेणारच असल्याचे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री म्हणून तुमची पसंती कोणाला? याबाबत देखील त्यांना प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्यामध्ये मला पडायचं नाही असे जरांगे म्हणाले.
सरकार स्थापन झाल्यानंतर सामुहिक उपोषमाला बसणार आहे. हे उपोषण अंतरवाली सराटीत किंवा मुंबईतही होऊ शकतं असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
गोर गरिबांच्या लेकराला न्याय मिळू दे, लढायला बळ मिळू दे, तुळजा भवानीच्या चरणी मागणं
माझ्या गोर गरिबांच्या लेकराला न्याय मिळू दे, लढायला बळ मिळू दे, आरक्षण मिळू दे आशिर्वाद मिळू दे हेच मागणं तुळजाभवानी मातेकडे मागितल्याची माहिती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली.
मुख्यमंत्री म्हणून तुमची पसंती कोणाला? याबाबत देखील त्यांना प्रश्न विचारण्यात आले. यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, राजकारण आमचं क्षेत्र नाही. कोणीही मुख्यमंत्री झाले तरी आरक्षण मात्र, घेणारच असल्याचे जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी केली देवदर्शन दौऱ्याला सुरुवात
मनोज जरांगे पाटील यांनी आज देवदर्शन दौऱ्याला सुरुवात केली. सकाळी ते 9 वाजता अंतरवाली सराटीतून निघालेल्या मनोज जरांगे यांनी तुळजापुरात कुलस्वामिनी तुळजा भवानीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
दरम्यान, तुळजा भवानीचे दर्शन घेतल्यानंतर जरांगे पाटील हे लगेच पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी आले होते. इथे आल्यावर दर्शन झाल्यानंतर भाजप आमदार समाधान अवताडे यांचे पुतणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ अवताडे यांनी जरांगे पाटलांचा सन्मान केला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज