टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्ण वाढीचा वेग दिवसेंदिवस वाढतच चालला असून आज 21 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 944 वर गेली आहे.
दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत असून आज 10 रूग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
आज दि.16 सप्टेंबर रोजी 9 नागरिकांचे स्वॅब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले आहेत. तसेच आज 214 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत.
वरील 214 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी पॉझिटिव्ह -18 आणि निगेटिव्ह 196 जणांचे अहवाल आलेले आहेत.
सदरचे नागरिक हे मंगळवेढा शहर 9 , दामाजीनगर 1 , बोराळे 1 , चिक्कलगी 1 , येळगी 1 , जालिहाळ 1 , डोंगरगांव 1 , हुलजंती 1 , लक्ष्मीदहिवडी 1 आणि आंबेचिंचोली,ता.पंढरपूर -1 येथील आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT – PCR ) चे 3 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले नाहीत.सदरचे नागरिक हे मंगळवेढा 1 बोराळे 1 आणि नंदेश्वर 1 येथील रूग्णांच्या निकटतम संपर्कातील आहेत.
मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत 944 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 411 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आतापर्यंत 515 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
सांगोला तालुक्यात आज ४९ नवीन कोरोना रुग्ण अढळले ; तालुक्यातील रुग्ण संख्या १२६२ वर !
सांगोला शहरात लॉकडाउन करून देखील कोरोनाचे रुग्ण वाढीची संख्या कमी होईना आज आणखी 49 जणांना लागण झाली असल्याने एकूण बाधितांची संख्या 1 हजार 262 वर गेली आहे.
दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत असून आज 23 रूग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
आज दि.16 सप्टेंबर रोजी 6 नागरीकांचे स्वँब (RT-PCR) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले आहेत. तसेच आज 453 रँपीड अन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत.
वरील 453 रपीड अन्टीजन टेस्ट केलेल्या नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह 49 आणि निगेटिव्ह 404 आलेले आहेत.
सदर नागरिक हे सांगोला शहर 13, डिसकळ 11, चोपडी-1, नाझरा 2, अजनाळे 3,वाकी शिवणे 6, ढाळेवाडी 1, कोळा 5,जुनोनी 5, आलेगाव 1,लोणवीरे 1 येथील आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वँब (RT-PCR) चे आज पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला नाही.
सांगोला तालुक्यात आतापर्यंत 1 हजार 262 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 546 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आतापर्यंत 704 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांची योग्य ती काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज