टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात कोरोनाने आपली पकड घट्ट केली असून आज तालुक्यातील रड्डे येथील एका महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या 19 झाली आहे तर आज 14 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे त्यामुळे एकूण बाधितांचीी संख्या 1 हजार 20 वर गेली आहे.
आज दि.21 सप्टेंबर रोजी नागरिकांचा 01 नागरिकाचा स्वब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेला आहे.
तसेच आज 227 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट ( RAT ) घेण्यात आलेल्या आहेत. 227 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी पॉझिटिव्ह 14 आणि निगेटिव्ह 213 जणांचे अहवाल आलेले आहेत.
सदरचे नागरिक हे मंगळवेढा शहर 5 , दामाजीनगर 1 , चोखामेळानगर 1 , बोराळे 3 , मुंढेवाडी 1 , खुपसंगी 2 , देगांव 1 येथील आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT – PCR ) चे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले नाहीत.
मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत 1 हजार 20 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 454 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आतापर्यंत 547 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे.
सांगोल्याच्या रुग्णसंख्येत पुन्हा मोठी वाढ
सांगोला शहर व ग्रामीण भागात कोरोनाने आपली पकड घट्ट केली असून आज पुन्हा रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.आज 72 नवे रुग्ण आढळले असून एकूण बाधितांची संख्या 1 हजार 508 वर गेली आहे.
आज दि.21 सप्टेंबर रोजी नागरिकांचे स्वब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले नाहीत. तसेच आज 325 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट ( RAT ) घेण्यात आलेल्या आहेत.
वरील 325 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी पॉझिटिव्ह 72 आणि निगेटिव्ह 253 जणांचे अहवाल आलेले आहेत.
सदरचे नागरीक हे सांगोला 35 , कडलास 3 , जवळा 1 , संगेवाडी 1 , जुनोनी 1 , मांजरी 1 , अकोला 5 , कोंबडवाडी 1 , महुद बु 9 , गायगव्हाण 1 , खवासपूर 1 , मानेगांव 4 , शिरभावी 4 , वासुद 1 , नाझरा 1 , उदनवाडी 1 , बलवडी 2 येथील आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT – PCR ) चे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले नाहीत.
सांगोला तालुक्यात आतापर्यंत 1 हजार 508 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 710 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आतापर्यंत 786 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांची योग्य ती काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Nineteen victims of Corona in Mangalwedha taluka; Large increase in the number of Sangola patients again
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज