mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 21, 2020
in मंगळवेढा, राजकारण
आजपासून आचारसंहिता लागू; ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले, तारखा जाहीर

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्याची राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या मरवडे ग्रामपंचायतीची आगामी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मरवडे ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 13 जागांसाठी जवळपास 5 हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

2015 मध्ये मरवडे ग्रामपंचायतीची चौरंगी निवडणूक झाली होती. त्यामध्ये छत्रपती परिवाराचे प्रमुख तथा शिक्षक नेते सुरेश पवार यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी ग्रामविकास पॕनलने बाजी मारली होती.

या गटाकडे सध्या 9 सदस्य आहेत. गेल्या पाच वर्षात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करीत जिल्हा स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्कार मिळवला आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून प्रमुख चारही गटाकडून ताकदीने मोर्चेबांधणी सुरु केली होती.त्यामुळे यंदाची निवडणूक रोमहर्षक होण्याची चिन्हे होती. मात्र गेल्या आठवडाभरापासून वेगवान घडामोडी घडत गेल्या.

त्यामध्ये सत्ताधारी गटाच्या विरोधात विरोधी तीन गट एकत्र आले असून प्रत्येकी चार जागावर सहमती झाली असून धनश्री परिवारालाही एक जागा देऊन सामावून घेण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा  वाढीस लागली आहे.

या एकीकरणाच्या समर्थनार्थ काही कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. या सर्व घडामोडीकडे मरवडेकर जनता मात्र तटस्थपणे बघत आहे.

या पार्श्वभूमीवर छत्रपती परिवार व स्वाभिमानी पॕनलचे पदाधिकारी कार्यकर्ते सावध भूमिकेत असून जनमताचा कानोसा घेऊन पुढील धोरण ठरविणार असल्याचे समजतेया पार्श्वभूमीवर छत्रपती परिवार व स्वाभिमानी पॕनलचे पदाधिकारी,कार्यकर्ते सावध भूमिकेत असून जनमताचा कानोसा घेऊन पुढील धोरण ठरविणार असल्याचे समजते.

2010 च्या निवडणूकीत परंपरागत पवार – तांबोळी गट एकत्र आल्यानंतर जनतेने तिसऱ्या आघाडीला संधी दिली होती . या पार्श्वभूमीवर या चारही गटाच्या एकीकरणाकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागून राहिले आहे.

जनतेशी संवाद साधून बिनविरोध देऊ

मागील पाच वर्षे सूज्ञ मरवडेकर जनतेने आम्हांला  काम करण्याची संधी दिली होती. पडलेली जबाबदारी आम्ही  प्रामाणिकपणे पार पाडली आहे. सर्व विरोधी गट एकत्र येऊन पर्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे.

या घटनेचे मी स्वागत करतो. आमच्या सत्ताधारी पॕनलने माघार घेऊन निवडणूक बिनविरोध होणार असेल तर आमची हरकत असणार नाही. मात्र याबाबतचा निर्णय जनतेशी संवाद साधून लवकरच घेऊ. बिनविरोध निवडणुकीच्या आड आम्ही येणार नाही.- संजय पवार,गटनेते , ग्रामपंचायत मरवडे.

——
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9970 76 6362 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9970 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: ग्रामपंचायतबिनविरोधमरवडे

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

July 26, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

बंपर ऑफर! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

July 25, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

​शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या आणि स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा; बोंबाबोंब आंदोलन शिवसेना आक्रमक; मंगळवेढा महावितरणला ८ दिवसांची मुदत; नेमकी अडचण आणि नागरिकांचा विरोध का?

July 24, 2026
मंगळवेढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! सारा अबॅकस’च्या विद्यार्थ्यांचे ‘नॅशनल समर कॉम्पिटिशन’मध्ये देदीप्यमान यश; अवघ्या ६ मिनिटांत १०० गणिते सोडवून विद्यार्थ्यांनी दाखवली चुणूक

मंगळवेढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! सारा अबॅकस’च्या विद्यार्थ्यांचे ‘नॅशनल समर कॉम्पिटिशन’मध्ये देदीप्यमान यश; अवघ्या ६ मिनिटांत १०० गणिते सोडवून विद्यार्थ्यांनी दाखवली चुणूक

July 24, 2026
खाकीची कमाल! ३ राज्यांतून शेकडो जणांचा शोध; महिला फौजदार डॉ.आरती कणिरे यांचा धडाका; बेपत्ता नागरिकांची झाली कुटुंबाशी गळाभेट

तरुणांनो..! बसस्थानक अन् कॉलेज परिसरात विनाकारण फिरताय? सावध व्हा; मंगळवेढ्यात १३ ‘रोड रोमिओ’ पोलिसांच्या जाळ्यात

July 24, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले? दिल्लीच्या राजकारणात शरद पवारांची मोठी खेळी

July 23, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

क्रौर्याची सीमा ओलांडणाऱ्या पतीला अखेर शिक्षा; मंगळवेढा येथील बहुचर्चित खटल्यात न्यायालयाचा मोठा निकाल

July 22, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नियतीचा क्रूर डाव! बाळ जन्माला आलं, पण माऊलीने जगाचा निरोप घेतला; मंगळवेढा येथील धक्कादायक घटना

July 20, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

रक्तदानातून घडणार सेवाभावी पांडुरंगाचे दर्शन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगावात महारक्तदान शिबिर; करुणा शिवशरण यांचा स्तुत्य उपक्रम

July 21, 2026
Next Post
सोलापूर कोरोना ब्रेकिंग! शनिवारी 153 जण कोरोना पॉझिटिव्ह; ‘या’ गावातील 10 जणांचा मृत्यू

मोठा दिलासा! सोलापूर ग्रामीणमध्ये सोमवारी 28 नवे कोरोना रुग्ण, कोरोनाचा एकही मृत्यू नाही

ताज्या बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूरकरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! उजनी ७५ टक्के भरले; दोन-तीन दिवसांत धरण ‘इतक्या’ टक्क्यांचा टप्पा पार करणार; शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटणार

July 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

July 26, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेपर्यंत पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; योजनेतील प्रमाणपत्रप्राप्त शेतकरी

July 25, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

बंपर ऑफर! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

July 25, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

​शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या आणि स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा; बोंबाबोंब आंदोलन शिवसेना आक्रमक; मंगळवेढा महावितरणला ८ दिवसांची मुदत; नेमकी अडचण आणि नागरिकांचा विरोध का?

July 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..