टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथे कोरोना लसीविषयी जनजागृती करताना ४० वर्षीय आशा सेविकेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी दिली.
अशोक चंदर सुतार असे संशयिताचे नाव आहे. दि.१६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास यातील आशा वर्कर व त्यांचे सहकारी कोरोना लसीविषयी जनजागृती करत होते.
तेव्हा संशयिताने एका सेविकेचा विनयभंग केला. त्यांच्या फिर्यादीवरून संशयिताविरुद्ध येथील पोलिसांत कलम ३५३, ३५४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
सहायक पोलिस निरीक्षक सत्यजित आवटे यांनी त्यास अटक करून न्यायालयात उभे केले .
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज