टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील महमदाबाद शेटफळ येथील ऊसाच्या फडाला वीज वितरण कंपनीच्या तारांचे घर्षण होवून पडलेल्या ठिणगीमुळे 5 एकर ऊस जळून
जवळपास 2 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली असून या घटनेची पोलिसांत नोंद झाली आहे.
यातील खबर देणारे जकाप्पा लक्ष्मण माने (रा.तपकिरी शेळफळ) यांची महमदाबाद शेटफळ येथे 9 एकर शेती असून त्यापैकी 5 एकरामध्ये पंधरा महिन्याचे ऊसाचे उभे पिक आहे.
सदर क्षेत्राचा गट नंबर 21 असून सदर शेतातून एम. एस. ई. बी. च्या इलेक्ट्रीक तारा गेलेल्या आहेत. दि.8 रोजी दुपारी 2.00 वा. खबर देणारे यांची सून गौरी हिने सांगितले की,
शेतातील ऊसाच्या पिकाला आग लागली आहे. खबर देणारे यांनी तात्काळ शेतात येवून आग पाहून आरडा ओरड केल्याने आवाज ऐकून शेजारचे परमेश्वर खरात,
ज्ञानेश्वर माने,बकासूर खरात,अरूण चौगुले,शिवाजी चौगुले,जिजाबाई चौगुले,रमेश माने आदीनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.
मात्र सदरची आग आटोक्यात आली नाही.त्यामुळे 5 एकरातील ऊस पूर्णपणे जळून 2 लाखाचे नुकसान झाल्याचे दिलेल्या खबरमध्ये म्हटले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज