टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढ्याचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांची बदली झाली असून आता मदन अशोकराव जाधव हे नवे तहसीलदार म्हणून पदभार स्विकारतील.
मंत्रालयातून बदलीचे आदेश आले असून स्वप्नील रावडे यांची करवीर तहसीलदार या पदावर बदली करण्यात आली आहे. नवे तहसीलदार हे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे तहसीलदार म्हणून काम पाहत होते.
स्वप्नील रावडे यांंची बदली झाली असून एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून रावडे यांची ओळख आहे.
अतिशय शांत स्वभावाचे रावडे यांनी लगातार चार वर्ष मंगळवेढा महसूलचा शंभर टक्के वसूली केली होती म्हणून त्यांचे नाव जिल्हाभरात गाजले होते.
निवडणुकांमध्ये उत्कृष्ट काम केल्या बद्दल त्यांचा जिल्हाधिका- यांनी सन्मान देखिल केला होता. त्यांच्या कार्यालयात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे समाधान करणे हीच त्यांची ख्याती होती.
स्वप्नील रावडे यांनी कोरोना काळात अतिशय उत्कृष्ट काम केले होते. त्यांना या कामासाठी अनेक पुरस्कार देखील मिळाले. अवैध वाळू उपशाला ब्रेक लावला. या संदर्भात त्यांनी कडक पाऊले उचलली होती.
शिरनांदगी येथील अंकुश जकाप्पा कटरे यांच्या घराला अचानक आग लागून घरातील सर्व कागदपत्रे, रेशनकार्ड, आधारकार्ड, बँकेचे पासबुक जळाले होते. दरम्यान, तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी त्याचे गांभीर्य ओळखून त्यांना दोन तासांत दुबार शिधापत्रिका देऊन या कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न केला होता.
मंगळवेढा तालुक्यातील माण नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांच्या ४ बोटी जिलेटिनच्या स्फोटाने उडविण्यात आल्या होत्या. तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी धडक कारवाई करीत वाळू माफियांना मोठा दणका दिला होता.
अतिवृष्टीतील शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज