mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खळबळ! बेरोजगार तरूणाकडून २८ लाख उकळले; फसवणूकप्रकरणी वीरशैव शिवाचार्यावर गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 14, 2023
in क्राईम, सोलापूर
भोंदूबाबा! मंगळवेढ्यात गुप्तधन काढून देण्याचा बहाणा करणाऱ्या महाराजाच्या मुसक्या आवळल्या; मिळाली ‘इतक्या’ दिवसाची पोलिस कोठडी

टीम मंगळवेढा टाईम्स ।

स्वतःच्या माध्यमिक शाळेत शिक्षकपदाची नोकरी लावतो म्हणून २८ लाख रूपये घेतले आणि नंतर नोकरी दिली नाही आणि घेतलेली रक्कमही परत केली नाही म्हणून

अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथील वीरशैव समाजाच्या बम्मलिंगेश्वर मठाचे मठाधिपती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांच्या विरोधात अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

यासंदर्भात नागणसूर गावच्याच शांतवीरप्पा शरणप्पा कळसगोड (वय ३२) या फसवणूक झालेल्या बेरोजगार तरूणाने फिर्याद नोंदविली आहे.

फिर्यादीनुसार श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी हे स्वतः अध्यक्ष असलेल्या नागणसूर येथील सीतामाता ज. शेळके प्रशालेत शिक्षकपदाची एक जागा रिक्त असल्याचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजींनी शांतवीरप्पा कळसगोड यास सांगून शिक्षकपदी नोकरी लावण्याचे आमीष दाखविले होते.

२ एप्रिल २०२२ रोजी यासंदर्भात झालेल्या भेटीत श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजींनी शिक्षकाची नोकरी हवी असेल तर २८ लाख रूपये आपणांस द्यावे लागतील, असे स्पष्टपणे सांगितले होते.

एवढी मोठी रक्कम नसल्याची अडचण पुढे केली असता श्रीकंठ शिवाचार्य यांनी शिक्षक होण्यासाठी १५-२० तरूण पैसे देण्यास तयार आहेत. त्यामुळे २८ लाख रूपये दिले तरच नोकरी मिळेल, असे बजावले.

त्यामुळे शांतवीरप्पा याने आपल्या घरची शेतजमीन विकली आणि त्यातून मिळालेले २८ लाख रूपये श्रीकंठ शिवाचार्य यांना २० मे २०२२ रोजी श्रीकंठ शिवाचार्य यांना त्यांच्या मठात नेऊन दिले.

तेव्हा शिक्षक मान्यतेसह इतर कामे पूर्ण करण्याची हमी श्रीकंठ शिवाचार्य यांनी दिली होती. परंतु पुढे ते शिक्षकपदाची नोकरी देण्यास टाळाटाळ करू लागले. मी नोकरी देऊ शकत नाही.

माझ्यावर धर्मसंकट आला आहे, अशी अडचण त्यांनी मांडली. तेव्हा हतबल झालेल्या शांतवीरप्पा याने, मला नोकरीची तीव्र गरज आहे. शेती विकून मी आपणांस २८ लाख रूपये दिले आहेत. माझा असा गळा कापू नका म्हणून विनवणी केली.

परंतु श्रीकंठ शिवाचार्य यांनी नोकरी लावली नाही आणि घेतलेली २८ लाखांची रक्कम तगादा लावूनही परत केली नाही. यात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेवटी शांतवीरप्पा याने पोलिसांत धाव घेतली.

नागणसूर बम्मलिंगेश्वर मठाचे मठाधिपती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांना लिंगायत समाजासह संपूर्ण वीरशैव समाजात मोठा मान आहे. मागील २०१९ सालच्या सोलापूर राखीव लोकसभा निवडणुकीत ते भाजपकडून उमेदवार म्हणून इच्छूक होते. त्यावेळी भाजपने गौडगावचे मठाधिपती डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजींना उमेदवारी देऊन निवडून आणले होते .

खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजींचा जातीचा दाखला बनावट आणि खोटा असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधात यापूर्वीच फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. सध्या हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात अपिलात प्रलंबित आहे.(स्रोत:लोकसत्ता)

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: फसवणूक
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

भीतीदायक! मंगळवेढ्यात जीप आडवून दाेघांना लुटले, ६२ हजारांचा मुद्देमाल जबरीने नेला काढून; ‘या’ मार्गावरील घटना

ब्रेकिंग! मंगळवेढ्यात अवैध देशी, विदेशी दारूची वाहतूक करणारे पिकअप पकडले; 10 लाखांचा मुद्देमाल जप्त; API अंकुश वाघमोडे यांची धडाकेबाज कामगिरी

June 2, 2023
उन्हाच्या झळा आणखी वाढणार; हवामान खात्यानं दिलेला ‘हा’ इशारा पाहून वेळीच सावध व्हा..!

सावधान! आज, उद्या जणू उष्णतेची लाटच; उगाचंच घराबाहेर नका पडू, ‘ही’ काळजी घ्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आवाहन

June 2, 2023
पोलीस निरीक्षक रणजित माने यांना निलंबित करा, सर्व राजकीय पक्ष एकवटले, बेमुदत धरणे आंदोलन सुरु; माने यांना कोण पाठीशी घालीत आहेत? आता कारवाई शिवाय माघार नाही

पोलीस निरीक्षक रणजित माने यांना निलंबित करा, सर्व राजकीय पक्ष एकवटले, बेमुदत धरणे आंदोलन सुरु; माने यांना कोण पाठीशी घालीत आहेत? आता कारवाई शिवाय माघार नाही

June 2, 2023
शेतकाऱ्यांची सुटका! घर बसल्या आपल्या मोबाईलवरून करा पिक नोंदणी; आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही

शेतकऱ्यांनो! ‘सिबिल स्कोअर’ शून्य असले तरीही मिळणार कर्ज; पण पीक कर्जासाठी आता ‘ही’ पडताळणी केली जाणार

June 1, 2023
मंगळवेढ्यातून भरदिवसा मोटारसायकलची चोरी; घरफोडी, मोटारसायकल चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ; ‘या’ ठिकाणी झाल्या चोऱ्या

धाडसी चोरी! मंगळवेढा शहरात चोरट्याने घराचे कुलूप तोडून 65 हजाराचे दागिने केले लंपास; अज्ञात चोरटयाविरुध्द गुन्हा दाखल

June 1, 2023
बसवेश्वर स्मारकासाठी निधी देण्याचे दिले आश्वासन; अर्थसंकल्पात कोणतीच निधीची तरतूद केली नाही

महात्मा बसवेश्वर यांच्या मंगळवेढ्यातील स्मारकासाठी आंदोलन उभारणार; बसव ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी केले जाहीर

June 1, 2023
खळबळ! दारूच्या नशेत गळपास घेऊन आत्महत्या; मंगळवेढा तालुक्यातील घटना

धक्कादायक! खासगी सावकाराच्या तगाद्याला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; चौघांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

May 31, 2023
मंगळवेढ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील यांची बदली, राजश्री पाटील यांची नियुक्ती

मोठी बातमी! मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांची बदली; ‘हे’ असतील नवे DYSP

May 30, 2023
शेतकऱ्यांनो! सहकार शिरोमणीची थकीत बीले दिल्यानंतरच कारखाना सुरू करणार; अभिजीत पाटील यांची ग्वाही

सभासदांनी मतदान रुपी आशीर्वाद द्यावा थकीत उसाची बील देण्याची सोय मी करतो; सहकार शिरोमणी सभासदांचा अभिजीत पाटील यांना वाढता प्रतिसाद

May 30, 2023
Next Post
खळबळ! दारूच्या नशेत गळपास घेऊन आत्महत्या; मंगळवेढा तालुक्यातील घटना

बाबो..! नवीन मोबाईलसाठी पत्नीने सर्दी ताप खोकल्याच्या ३० ते ४० गोळ्या एकदम खाल्ल्या; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना अपुऱ्या व विस्कळीत वीज पुरवठ्यापासून दिलासा; नवीन डीपी व क्षमतावाढसाठी ६ कोटी ४९ लाखांचा निधी मंजूर; आ.समाधान आवताडे यांची माहिती

किडनी प्रत्यारोपण उपचारासाठी आ.आवताडे यांच्या प्रयत्नांतून २ लाखांची मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य मदत

June 3, 2023
मोठी बातमी! दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर; कुठे आणि कसा पाहाल? जाणून घ्या

मुलींची बाजी! मंगळवेढा तालुक्यात दहावी निकालात इंग्लिश स्कूलची ‘ही’ विद्यार्थ्यांनी राज्यात पहिली; शंभर टक्के निकालाच्या ‘या’ आहेत शाळा

June 2, 2023
भीतीदायक! मंगळवेढ्यात जीप आडवून दाेघांना लुटले, ६२ हजारांचा मुद्देमाल जबरीने नेला काढून; ‘या’ मार्गावरील घटना

ब्रेकिंग! मंगळवेढ्यात अवैध देशी, विदेशी दारूची वाहतूक करणारे पिकअप पकडले; 10 लाखांचा मुद्देमाल जप्त; API अंकुश वाघमोडे यांची धडाकेबाज कामगिरी

June 2, 2023
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

खिडक्या थरथरल्या. भांडी खणखणली… मंगळवेढा परिसरात गूढ मोठा आवाज; ‘या’ गोष्टीचा असल्याचा अंदाज

June 2, 2023
उन्हाच्या झळा आणखी वाढणार; हवामान खात्यानं दिलेला ‘हा’ इशारा पाहून वेळीच सावध व्हा..!

सावधान! आज, उद्या जणू उष्णतेची लाटच; उगाचंच घराबाहेर नका पडू, ‘ही’ काळजी घ्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आवाहन

June 2, 2023
मंगळवेढा । DYSP पदाची सुत्रे विक्रांत गायकवाड यांनी स्विकारली; कारखाना रोडने होणारी अवैध वाळू वाहतूक रोखण्याचे असणार आवाहन

मंगळवेढा । DYSP पदाची सुत्रे विक्रांत गायकवाड यांनी स्विकारली; कारखाना रोडने होणारी अवैध वाळू वाहतूक रोखण्याचे असणार आवाहन

June 2, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा