टीम मंगळवेढा टाईम्स ।
नवीन मोबाईल घेऊन देण्यासाठी पत्नीने जास्त प्रमाणात औषधी गोळ्या खाल्ल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी गावात सोमवारी रात्री घडली.
निंबव्वा निंगदळी ( वय ३८, रा. मैंदर्गी ) असे त्या महिलेचे नाव आहे. सोमवारी रात्री राहत्या घरात पत्नीने मला नवीन मोबाईल घेऊन द्या असे नवऱ्याला म्हंटले.
नवऱ्याने आठ ते दहा दिवसात नवीन मोबाईल घेऊन देतो असे म्हटले. तेव्हा पत्नीने रागाच्या भरात घरात शिल्लक असलेल्या सर्दी ताप खोकल्याच्या ३० ते ४० गोळ्या एकदम खाल्ल्या.
याचा त्रास होऊ लागल्याने तिला अक्कलकोट येथील सरकारी दवाखान्यात प्रथमोपचार करून रेफरने छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज