टीम मंगळवेढा टाईम्स ।
प्राथमिक आरोग्य केंद्र मरवडे येथे मंगळवेढा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांचेवतीने मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये 53 रुग्णांची मोफत हृदयरोग तपासणी करण्यात आली. 53 रुग्णांचे इसीजी व इतर तपासण्या मोफत करण्यात आल्या.
या रुग्णांमधून तेरा रुग्णांना हृदयरोगासंदर्भात पुढील उपचारांची गरज असल्याने त्यांना हॉस्पिटलला येण्याचा सल्ला देण्यात आला.
या सर्व रुग्णांची हॉस्पिटलचे फिजिशियन डॉ. विलास तोंडे-पाटील, डॉ.सौ. प्रतिभा विलास तोंडे- पाटील डॉ. सोनल यादव यांनी तपासणी केली.
या शिबीराच्या यशस्वीतेसाठी मुख्य जनसंपर्क अधिकारी सादिक शेख, कॅथलॅब टेक्निशियन सनी बिरंजे, गुरुनाथ शिवशरण, गणेश कोरे, रंजना कांबळे, जाधव,
नितीन घाटूळे, भारत शिंदे यांचेसह मरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायिका, आरोग्य सेविका व आशा स्वयंसेवीका यांनी परिश्रम घेतले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज