टीम मंगळवेढा टाईम्स।
धनश्री परिवार व सिताराम परिवारातील श्री सदगुरु सिताराम महाराज अर्बन को- ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मंगळवेढा या संस्थेचा उद्घाटन सोहळा आज सोमवार दि.१९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता शिवप्रेमी चौक, शिवालय शेजारी
मंगळवेढा येथे पार पडणार असल्याची माहिती धनश्री परिवार व सिताराम परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी दिली आहे.
ह. भ. प. जयवंत बोधले महाराज यांच्या शुभहस्ते तर सोलापूर जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
याप्रसंगी मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, सहाय्यक निबंधक प्रमोद दुरगुडे, दामाजी शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील,
व्हा. चेअरमन तानाजी खरात, उद्योजक वैभव नागणे, सांगोला सूतगिरणीचे माजी चेअरमन नानासाहेब लिगाडे यांचेसह सर्व संचालक मंडळ व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
विश्वसनीय व्यवहारांद्वारे अनेक कुटुंबांच्या आर्थिक प्रगतीमध्ये हातभार लावणाऱ्या धनश्री परिवाराचा बँकिंग क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचा आणखी फायदा समाजातील सर्व सामान्यांना व्हावा ह्या हेतूने श्री.सद्गुरू सिताराम महाराज अर्बन को- ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मंगळवेढा या नवीन संस्थेची स्थापना केली आहे.
या संस्थेतून डिजिटल बँकिंग सेवांच्या माध्यमातून मोबाईल बँकिंग, बाहेरच्या बॅंकेत ऑनलाइन पैसे पाठविण्यासाठी आरटीजीएस व एनइएफटी सुविधा उपलब्ध आहे. मुदत ठेवींवर आकर्षक व्याजदर त्याचबरोबर रिकरिंग ठेव, दामदुप्पट ठेव, लखपती ठेव व कन्यारत्न रिकरिंग ठेव या सारख्या ठेवींही आकर्षक व्याजदरासह स्वीकारली जातात.
ग्राहकांना आकर्षक व्याजदराच्या माध्यमातून विविध कर्जाची सुविधाही उपलब्ध आहे. त्याचबरोबर क्यूआर कोड च्या माध्यमातून खातेदारांना ऑनलाईन व्यवहारासाठी सुविधा मिळत असून, सध्याच्या डिजिटल संगणक युगात रोखीने देवाण-घेवाण व्यवहार कमी हाेत चालल्याने
बँकेच्या खातेदारांना त्यांचे व्यवसायातील आर्थिक व्यवहार करण्यासाठी क्यूआर कोड च्या माध्यमातून मदत होणार आहे. तसेच बँकेतील कर्मचारी देखील अत्यंत चांगल्या प्रतीची विनम्र व तत्पर सेवा देण्यास कटीबद्ध आहेत.
काही अर्थ वाढवावा ! संसार सुखे करावा !! हे ब्रीदवाक्य घेऊन सर्वसामान्यांच्या जीवनात श्री सद्गुरू सिताराम महाराज अर्बन सोसायटीच्या माध्यमातून अर्थक्रांती घडवून आणण्याचे आमचे व्हिजन आहे.
तरी धनश्री परिवार व सिताराम परिवारातील या नवीन संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी आपण सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन धनश्री परिवार व सिताराम परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज