टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरातील खोमनाळ नाका परिसरातील कांचन हरी ताड यांनी प्रदीप शिंदे यांना मारहाण करून खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद होता.
यातून ताड यांची पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. बी. लंबे यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जामीन मंजूर केला.
याबाबतची माहिती अशी, दि. १९ एप्रिल रोजी प्रदीप हा खोमनाळ नाका येथे दत्तात्रय हजारे यांच्या दुकानात कामास गेला होता.
दुपारी चार वाजेच्या दरम्यान हजारे यांनी फोन करून मुलगा प्रदीप यास हरी ताड व कांचन ताड व त्यांचा मुलगा यांनी काठीने डोक्यात मारून जखमी केले आहे.
संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असे यातील फिर्यादी लक्ष्मण शिंदे यांना सांगितले. अशी फिर्याद लक्ष्मण शिंदे यांनी दिली.
लक्ष्मण शिंदे यांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज बघितले. त्याप्रमाणे मुलगा प्रदीप यास काठीने मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून हरी ताड, कांचन ताड व त्यांचा मुलगा यांच्याविरुद्ध मंगळवेढा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
दि.१९ एप्रिल रोजी आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले. दि. २३ एप्रिलपासून ते न्यायालयीन कोठडीत होते. न्यायालयासमोर उभे केले असता
आरोपी कांचन ताड यांना जामीन मंजूर झाला आहे. आरोपीच्या वतीने अॅड. संताजी माने, अॅड. सागर टाकणे, अॅड. यू. सी. बागल यांनी काम पाहिले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज