टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील माजी नगरसेवक महादेवराव अंबादास नागणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती उदयोजक वैभव नागणे यांनी दिली.
आज सकाळी १०.०० वा . सोलापूर रोडवरील श्री संत दामाजी मुकबधीर विदयालयात मुलांना मिष्ठान्न भोजन,
११.०० वा. सोलापूर रोडवरील स्मशानभूमीतील मशानजोगी कुटुंबियांना धान्य व संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
आज दुपारी १२.०० वा.किल्ला भागातील गुरुकूल विदयालयातील मुलांना खाऊ वाटप करण्यात येणार आहे.
दुपारी १.३० वा.गोपाळपूर येथील मातोश्री वृध्दाश्रमातील वृध्द माता पित्यांना फळे व धान्य वाटप करण्यात येणार आहे.
पंढरपूर रोडवरील देगाव ढेकळेवाडी येथील नागणे फार्म हाऊस येथे आज सायंकाळी ६.०० वा. महादेवराव नागणे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
याप्रसंगी सोलापूर जिल्ह्यातील व परिसरातील विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन वायसन इंडस्ट्रीज व्ही.एन. ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज यांच्यावतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज