मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत २५ टक्के प्रवेश वंचित आणि दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्यात येतात. ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक पद्धतीने पार पडत असते.
आता आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेला वेग आला असून सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील लॉटरी निवड यादी जाहीर झाली असून त्यासंदर्भातील एसएमएस पालकांच्या मोबाईलवर पोहचला असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२५-२६ या वर्षाकरिता निवड यादीतील
प्रवेशपात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होतील; परंतु पालकांनी फक्त एसएमएसवर अवलंबून न राहता
आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही, याची खात्री करावी. अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत, त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा.
पालकांना प्रवेशपत्र दिले जाणार
सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना कागदपत्रांची पडताळणी करावी लागणार आहे. पालकांनी सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल.
पडताळणीत कागदपत्रे योग्य ठरल्यास समितीकडून त्या विद्यार्थ्याच्या पालकांना प्रवेशपत्र दिले जाणार आहे. त्या प्रवेश पत्रानुसार संबंधित शाळेत प्रवेश दिला जाणार आहे.
२८ फेब्रुवारीपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी
२८६ शाळांमध्ये पहिल्या टप्प्यात लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती पालकांच्या मोबाईलवर १ प्राप्त झाली आहे. दरम्यान, निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना १४ ते २८ फेब्रुवारीपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पडताळणी प्रक्रिया सुलभ3 करण्यासाठी सर्व गट शिक्षण अधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यंदाच्या वर्षी आरटीई मोफत प्रवेश प्रक्रिया वेगात सुरु झाली आहे.(स्रोत:लोकमत)
आरटीई प्रवेशासंदर्भातील पहिल्या टप्प्यातील यादी जाहीर झाली आहे. पालकांना एसएमएसद्वारे कळविण्यात आले आहे. पालकांनी पडताळणीसमोर कागदपत्रांची तपासणी करून प्रवेश प्राप्त करून घ्यावे.
कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवले जाणार आहेत.- कादर शेख, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज