mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

रुग्णांची लूट! कोरोना काळात 90 टक्के लॅबवाले बोगस? लॅब चालकांचा गोरख धंदा जोरात; कसी ओळखाल नोंदणीकृत लॅब

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 17, 2021
in राज्य
रुग्णांची लूट! कोरोना काळात 90 टक्के लॅबवाले बोगस? लॅब चालकांचा गोरख धंदा जोरात; कसी ओळखाल नोंदणीकृत लॅब

टीम मंगळवेढा टाईम्स ।

महाराष्ट्रभरात लॅबोरोटोरी सेवा देणारे पॅथॉलॉजिस्ट तुलनात्मक दृष्टीने अत्यल्प आहेत या अनुषंगाने आरोग्यसेवा अबाधित ठेवण्यासाठी शासनाने डीएमएलटी पदवी धारकांना क्लिनिकल लॅबरोटरी सेवा ठेवण्यासाठी लॅबोरटरी सेवा मेडिकल कौन्सिल कौन्सिल कायदा 2011, 19 जुलै 2012 ,व 2016 चा अधिनियम क्रमांक 6 तसेच 30 जानेवारी 2016 अन्वये 18 ऑक्टोबर 2017 पासून स्वतंत्रपणे पँरा वैद्यकीय परिषद अस्तित्वात आणले आहे या अधिनियमाखाली कलम 26 (1) अंतर्गत स्वतः स्पष्ट तरतूद केली आहे.

पँरामेडिकल कौन्सिल नोंदणीचे प्रमाणपत्र ज्याच्याकडे नसेल अशा स्वतंत्रपणे क्लिनिकल लॅब चालवणारा टेक्निशनवर महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम 2011 च्या कायद्यानुसार अपराध व व सारथी मधील कलम 31, 32 ,33 व यातील  कलमान्वये कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे.

जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागातील लॅब चालक रुग्णाच्या जीवाशी खेळत असून अशा बोगस लॅब चालकांवर कारवाई करावी असा सूर जनतेतून उठत आहे.

सध्या कोरोनाच्या महामारीत राज्यभर संकट असून अनेक रुग्णांना भरमसाठ लूट केली जात आहे व योग्य उपचार मिळत नसल्यामुळे मृत्यू होत आहे.

तरी राज्यात जिल्ह्यातील शहर व ग्रामीण मध्ये अशा अनेक बोगस लॅब चालक असून बरेच  दिवसापासून गोरख धंदा चालला आहे त्यामुळे रुग्णांना त्रासास सामोरे जावे लागत आहे.  महाराष्ट्र पँरा मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी नसेल तर लॅब चालकास व्यवसाय करता येत नाही तसा कायदा आमलात आला.

पी एम सी रजिस्ट्रेशन व महाराष्ट्र पँरा वैद्यकीय परिषद मध्ये समाविष्ट नसलेल्या मान्यताप्राप्त मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी पदवी, पदविका नसताना अनेक जण राज्यात पॅथॉलॉजी क्लिनिकल, लॅबरोटरी चे व्यवसाय करत  तालुक्यातील अनेकांच्या अवास्तव शुल्क आकारून रुग्णास त्रासास सोमोरे जावे लागत आहे.

मान्यताप्राप्त विद्यापीठाची व बोर्डाची शैक्षणिक पात्रता नसताना व्यवसाय उघडून बसले आहेत व रुग्णाच्या आरोग्याची खेळत आहे राज्यात महाराष्ट्र पँरा वैद्यकीय परिषद स्थापित झाले असून सदर परिषदेमध्ये योग्य शैक्षणिक अहर्ता धारकांची नोंदणी केली जाते.

सध्या महाराष्ट्र पॅरा वैद्यक परिषद ,मुंबई कडे दोन वर्षात फक्त 2700 अर्ज नोंदणी साठी आले होते त्यातील 1500 सदस्यांची नोंदणी झाली असून  कौन्सिल चे प्रमाणपत्र दिले गेले आहेत तर बाकीचे 1300 अर्ज त्रुटी अभावी पेंडिंग आहेत.शैक्षणिक पात्रताच नसल्यामुळे राज्यात अनेक लॅब चालकांनी परिषदकडे नोंदणी केली नाही.

परंतु जिल्हा ,शहर तालुके, परिसरात  गल्ली बोळात कमी कालावधीत रुपये कमावण्यासाठी दुकान थाटून गोरख धंदा चालू केला आहे.परंतु राज्यभरात साधारण 60 ते 70 हजार बोगस लॅब असल्याचे सांगितले जात आहेत.

महाराष्ट्र राज्यातील आरोग्य यंत्रणा कोलमंडली असल्याने अनेक वैद्यकीय बोगस व्यवसाय फोफावलेने चित्र निर्माण झाले आहे  जनतेला कोरोनाच्या संकटात भर पडली आहे परंतु अनेक जिल्ह्यात व तालुक्यात लॅब चालकांची शैक्षणिक पात्रता नसल्याने तसेच नोंदणी करून न घेता अनाधिकृत लॅबरोटरी चा व्यवसाय  करीत आहेत तसेच अनेक वैद्यकीय व्यवसाय कमिशनपोटी कोरोना ची रॅपिड , आर टी पी सी आर टेस्ट आदी टेस्ट न करता अशा बोगस लॅबधारकास रुग्णाचे रक्त तपासणी साठी पाठवले जात आहेत व प्रोत्साहन देत आहेत त्यामुळे त्या रुग्णांना आर्थिक नुकसान व चुकीच्या उपचारांमुळे बळी पडावे लागत आहे.

जिल्हाधिकारी , प्रांताधिकारी , तहसीलदार , आरोग्य विभाग , पोलीस प्रशासन , मुख्याधिकारी आदी  पथकाने याची तात्काळ दखल घेऊन महाराष्ट्र पँरा वैद्यकीय परिषद कायदा  33 नुसार कारवाई करण्यात यावी.तसेच चालू असलेला लॅब चालकांचा गोरख धंदा बंद करून गुन्हा दाखल करावा असे जनतेतून बोलले जात आहे.

तरी प्रशासनाने महाराष्ट्र राज्यातील जिल्हा, तालुकानिहाय असल्याल्या लॅबचालकांची योग्य शैक्षणिक अहर्ता तसेच व्यवसाय करण्यासाठी लागणारे पॅरा मेडिकल कौंसिल चे प्रमाणपत्राची  पडताळणी करून असलेल्या बोगस लॅब वर कायदेशीर कारवाई करावी असे मागणी होत आहे.

लॅब चालकांची अधिकृत व अनधिकृत कुठलेही दफ्तरी नोंद शासनाच्या आरोग्य विभागाकडे नाही. गेली 25 वर्षे राज्यात बोगस लॅब चा धंदा . चुकीच्या निदानाने रुग्णास ,नातेवाईक यांना मनस्ताप व पैशाची लूट  ,कोरोनाच्या महामारीत  राज्यभरात लॅब चालकांची दुप्पट संख्या अनेकांनी बोगस लॅब चालू केल्या.

पथॉलॉजीष्ठ च्या नावे असलेल्या अनेक हॉस्पिटल ,  डायग्नोस्टीक सेंटर  मध्ये लॅब चालू लॅब चालक देतात अहवाल. कोरोनाच्या महागडया तपासणी मुळे बोगस लॅब तेजीत व आर्थिक फायदा. अनेक वैद्यकीय व्यवसाय व लॅब चालक यांच्यात चाचणीच्या ग्रेडनुसार टक्केवारी. राज्यात अनेक पँरामेडिकल शैक्षणिक संस्था बोगस अजूनही कारवाई नाही.

आरोग्य विभागास  माहित असूनही बोगस लॅब संबधी आतापर्यंत कुठलेही मोठी कारवाई झाली नाही . तरुण बेरोजगार युवकांचा  ज्यादा पैसा मिळवण्या आमीषपोटी बोगस लॅब कडे कल. (स्रोत : सकाळ)

योग्य शैक्षणिक अर्हताधारक लॅब चालकांनी महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषदेकडे नोंदणी केली असेल तर त्यास व्यवसाय करता येतो. तसा कायदा अमलात आला. परंतु जिल्ह्यात अनेक बोगस लॅबचालक असून कोरोनाच्या संकटात कमिशनपोटी जनतेची अमाप लूट होत आहे. तरी बोगस लॅबवर प्रशासनाने कारवाई करून गुन्हा दाखल करावा. – दावल इनामदार, सदस्य, महाराष्ट्र पॅरावैद्यकीय परिषद, मंगळवेढा

कोरोनाच्या संकटात बोगस लॅब चालक रुग्णांचा जीवाशी खेळत असून अमाप पैशाची लूट करीत आहे अशा तक्रारी राज्यभरात आल्या असून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवली असून प्रशासनाने  तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी . ” —- धनंजय कुलकर्णी , अध्यक्ष ,महाराष्ट्र परावैद्यक परिषद ,मुंबई

ADVERTISEMENT

“राज्यातील ज्या लॅबचालकांनी
पँरामेडीकल कौन्सिलकडे अद्यापही नोंदणी केली नाही अशा बोगस लॅब चालकांवर प्रशासनाने दखल घेऊन कारवाई करावी “.
—-  आण्णासाहेब करोले ,
अध्यक्ष ,अकॅलप संघटना

 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: लॅब

संबंधित बातम्या

सोलापुरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी उद्या बोलावली बैठक; सर्व आमदार,खासदारांसह अधिकारी राहणार उपस्थित

मामा संतापले! पालकमंत्री बदलणे म्हणजे बाजारातला भाजीपाला असतो का? मंगळवेढा, बार्शीसाठीची ‘ही’ योजना देखील लवकरच मार्गी लागेल

May 28, 2022
नागरिकांनो! सोलापूर जिल्ह्यात आजपासून विना मास्कचे फिरताना आढळल्यास थेट गुन्हे दाखल होणार

नागरिकांनो सावधान! महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं; पुन्हा निर्बंध लागणार?

May 28, 2022
महाराष्ट्रातील ‘या’ शहरांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन उभारणार; गृहमंत्र्यांची घोषणा

लागा तयारीला! महाराष्ट्रात ७ हजार पदांवर पोलीस भरती प्रक्रिया; गृहमंत्री वळसे पाटलांकडून तारीख ‘जाहीर’

May 28, 2022
शिवसेना नेत्याची ईडीकडे तक्रार, सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ आमदाराची ईडीकडून चौकशी; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

Breaking! शिवसेनेच्या ‘या’ बड्या मंत्र्याच्या घरासह 7 ठिकाणी ईडीची छापेमारी; गुन्हाही दाखल

May 26, 2022
पदवीधरसाठी रणधुमाळी शिगेला; देशमुख, ढमाले, पाटील व लाड यांच्यात काटे की टक्कर

मोठी बातमी! विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक जाहीर; ‘या’ तारखेला मतदान असा असेल निवडणूक कार्यक्रम

May 26, 2022
संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील…;संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्याने मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील…;संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्याने मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

May 25, 2022
मोदींची चिंता दूर! कोण म्हणतं मोदी लाट ओसरली? यूपीपासून मणिपूरपर्यंत मोदी मोदी मोदी; 2024 ला फिर एक बार?

जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण; पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘या’ तारखेला देहू दौऱ्यावर

May 25, 2022
सोलापुरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी उद्या बोलावली बैठक; सर्व आमदार,खासदारांसह अधिकारी राहणार उपस्थित

मोठी बातमी! भरणेमामांना पालकमंत्रीपदावरुन हटवलं तर मुख्यमंत्र्यांना आषाढीवारीला विरोध; यांनी दिली इशारा

May 23, 2022
पेट्रोल पंप सुरू करणं आता अधिक सोप झालं, पंप सुरू करण्याबाबतचे अनेक नियम बदलले

महाराष्ट्रात व्हॅट कपातीनंतर पेट्रोल, डिझेल आणखी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

May 23, 2022
Next Post
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सरपंचानो! उजनीतील पाणी वाचवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींनी ठराव करावेत

ताज्या बातम्या

सोलापुरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी उद्या बोलावली बैठक; सर्व आमदार,खासदारांसह अधिकारी राहणार उपस्थित

मामा संतापले! पालकमंत्री बदलणे म्हणजे बाजारातला भाजीपाला असतो का? मंगळवेढा, बार्शीसाठीची ‘ही’ योजना देखील लवकरच मार्गी लागेल

May 28, 2022
नागरिकांनो! सोलापूर जिल्ह्यात आजपासून विना मास्कचे फिरताना आढळल्यास थेट गुन्हे दाखल होणार

नागरिकांनो सावधान! महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं; पुन्हा निर्बंध लागणार?

May 28, 2022
मंगळवेढ्यात ‘खून का बदला खून’ मधील तिघांची निर्दोष मुक्तता; वाचा सविस्तर बातमी

मंगळवेढ्यात लाच स्विकारलेल्या त्या दोघांना मिळाली ‘इतक्या’ दिवसाची न्यायालयीन कोठडी

May 28, 2022
धक्कादायक! मंगळवेढ्यातील विवाहित महिलेला पळवून नेवून केला बलात्कार; आरोपीला अटक

सोलापुरात प्रेमविवाहानंतर मानपान न केल्यानं मारहाण करून पत्नीला घराबाहेर काढले; पती, सासू-सासऱ्यासह पतीच्या मित्रांवर गुन्हा दाखल

May 28, 2022
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

May 28, 2022
महाराष्ट्रातील ‘या’ शहरांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन उभारणार; गृहमंत्र्यांची घोषणा

लागा तयारीला! महाराष्ट्रात ७ हजार पदांवर पोलीस भरती प्रक्रिया; गृहमंत्री वळसे पाटलांकडून तारीख ‘जाहीर’

May 28, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा