टीम मंगळवेढा टाईम्स ।
गेल्या अनेक दिवसांपासून लोक आयपीएलची वाट पाहात होते. येत्या 22 मार्च रोजी यंदाच्या आयपीएल हंगामाचा पहिला सामना होणार आहे. त्याआधीच यावेळी आपयपीएल नेमका कुठे पाहावा?
आयपीएलचे सामने पाहण्यासाठी पैसे भरावे लागणार का? असे प्रश्न विचारले जात आहेत. असे असतानाच आता जिओने क्रिकेटच्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे.
क्रिकेटच्या वेगवेगळ्या स्पर्धा आणि आयपीएल लक्षात घेऊन जिओने 90 दिवसांसाठी मोफत जिओस्टार सबस्क्रीप्शनची ऑफर आणली आहे. ही ऑफर नेमकी काय आहे? ते जाणून घेऊ या…
नेमकी ऑफर काय आहे?
आगामी आयपीएलचा हंगाम लक्षात घेऊन जिओ या टेलकॉम कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत जिओ सिमकार्ड वापरकर्त्यांना तब्बल 90 दिवस जिओहॉटस्टारचे सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे. जिओ सिमकार्ड असणाऱ्यांनाच ही ऑफर लागू असेल.
ही ऑफर मिळवण्यासाठी जिओ सिमकार्ड वापरकर्त्यांना कमीत कमी 299 रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. कमीत कमी 299 रुपयांचे रिचार्ज करणाऱ्यालाच आगामी 90 दिवसांसाठी म्हणजेच तीन महिने जिओस्टारचे सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे. ही ऑफर 31 मार्च 2025 पर्यंत लागू असणार आहे.
नव्याने जिओचे सिमकार्ड घेणाऱ्या व्यक्तीलाही ही ऑफर लागू होईल. मात्र त्यासाठी त्या व्यक्तीला कमीत कमी 299 रुपयांचे रिचार्ज करावे लागेल.
दरम्यान, जिओच्या या ऑफरचा अनेकांना फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे. क्रिकेटवर प्रेम असणाऱ्यांनी या ऑफरचा लाभ घेतला तर त्यांना आगामी दोन महिने जिओचे सामने मोफत पाहता येणार आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज