mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

Breaking! पाच खुन करुन आजन्म कारावासाची शिक्षा झालेला व 20 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा जाफर पवार जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 6, 2023
in क्राईम, मंगळवेढा, सोलापूर
Breaking! पाच खुन करुन आजन्म कारावासाची शिक्षा झालेला व 20 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा जाफर पवार जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी

पाच खुन करुन आजन्म कारावासाची शिक्षा शाबीत झालेला व शिक्षेपासुन मागील 20 वर्षापासुन पोलिसांना गुंगारा देणारा जाफर उर्फ जाफऱ्या बाळू पवार (वय 60, सिद्धापूर ता.मंगळवेढा) याला अटक करण्यात आली आहे.

सोलापूर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिद्धापूर येथून सापळा रचुन पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले आहे.

अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे गुरनं 06/1992 भादंवि क 302, 147, 148, 326, 504, 506 प्रमाणे दाखल असुन सदर गुन्हयात आरोपीत यांनी दोन महिला व तीन मुलांना जिवे ठार मारले होते.

नमुद गुन्हयात मा. सत्र न्यायालय सोलापूर यांनी दि.15/12/1994 रोजी आरोपीत यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

यातील आरोपीत यांनी मा. उच्च न्यायालय मुंबई येथे सदर शिक्षे विरोधात अपिल केले होते. मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी सदर अपिल दिनांक 18/05/2005 रोजी फेटाळले असुन तेव्हा पासुन आरोपी मिळुन येत नव्हता.

सत्र न्यायालय सोलापूर यांनी सदर आरोपी यास पकडणे बाबत स्थायी वॉरंट काढले होते. नमुद गुन्हयाची तीव्रता लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सदर स्थायी वॉरंट बजावणीसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांना आदेशीत केले होते.

सदर आरोपी हा रेकॉर्ड वरील आरोपी असुन त्याचे विरुध्द खुन, दरोडा, खुनासह दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, फसवणुक सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे गुरनं 06/1992 भादंवि क 302, वगैरे या पाच जणाच्या खुनांच्या गुन्हयात न्यायालयाने सुनावलेली आजन्म कारावासाची शिक्षा टाळण्याकरीता आरोपी हा मागील 20 वर्षा पासुन त्याचे अस्तित्व लपविण्याकरीता वेगवेगळया ठिकाणी राहत असे.

स्थानिक गुन्हे शाखेकडील सहा.पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व पोउपनि सुबोध जमदाडे यांचे पथकाने आरोपी याची गुप्त् बातमीदारा मार्फत माहिती प्राप्त् केली.

प्राप्त् माहिती प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन्ही पथकांनी दिनांक 05/06/2023 रोजी सिध्दापूर ता.मंगळवेढा येथे सापळा रचुन आरोपीचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले.

आरोपीत यास सत्र न्यायालय सोलापूर यांचे न्यायालयात हजर केला असता, सत्र न्यायालय सोलापूर यांनी सदर आरोपीस आजन्म कारवासाची शिक्षा भोगण्याकरीता कारागृहात रवानगी केली आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण शिरीष सरदेशपांडे, व अपर पोलीस अधीक्षक, हिम्मत जाधव, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांचे नेत्तृत्वाखाली

सहा.पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, पोउपनि सुबोध जमदाडे, पोसई राजेश गायकवाड, सपोफौ श्रीकांत गायकवाड, सपोफौ शिवाजी घोळवे, पोहवा परशुराम शिंदे, सलीम बागवान, हरिदास पांढरे,

आबासाहेब मुंढे, पोना रवी माने, मपोना ज्योती काळे, पोकॉ अजय वाघमारे, समर्थ गाजरे, सुरज रामगुडे, यश देवकते, चापोहवा प्रमोद माने, चापोशि दिलीप थोरात, यांनी केली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: जाफर पवारमंगळवेढा

संबंधित बातम्या

सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 16, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 16, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांची दहशत; खुनाचा बनाव रचून शेतकऱ्याचे दागिने लंपास; एकाच दिवशी दोन घटनांनी खळबळ

September 14, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 13, 2026
शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

September 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

आंदोलक बांधवांच्या पाठीशी मंगळवेढ्याचे वकील खंबीर; कोणतीही कायदेशीर कारवाई झाल्यास लढणार विनामूल्य लढा; मोफत कायदेशीर मदतीची घोषणा

September 12, 2026
Next Post

राष्ट्रवादीवर नाराज असलेले भगीरथ भालकेंचा रुसवा तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव काढणार? भालकेंसाठी खास विमान पाठविले पक्ष प्रवेशाची चर्चा

ताज्या बातम्या

सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 16, 2026
​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

September 16, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 16, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..