mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! ‘सिल्व्हर ओक’वर दीड तास खलबतं; शरद पवार-उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा काय? आतली बातमी समोर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 12, 2023
in राजकारण, राज्य
आघाडीत मतभेद! आधी राहुल गांधींना सुनावले, आता उद्धवबाबतही नाराजी; शरद पवारांचा ‘B’ प्लॅन; सत्तेसाठी नवी खेळी; शिंदेंचे १६ आमदार अपात्र ठरल्यास…

टीम मंगळवेढा टाईम्स। 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत आज ‘सिल्व्हर ओक’वर शरद पवार यांच्यात चर्चा झाली आहे.

यावेळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील तिथे उपस्थित होते. यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि जयंत पाटील या चारही नेत्यांमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

विशेष म्हणजे जवळपास दीड तास या चारही नेत्यांमध्ये खलबतं झाली. यावेळी नेमकी काय-काय चर्चा झाली, या विषयाची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

‘सिल्व्हर ओक’वरील बैठकीनंतर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “जागा वाटप लवकरात लवकर पूर्ण करावं. त्यासाठी काँग्रेससोबत चर्चा होणं आवश्यक आहे.

उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे सर्व मंडळी भविष्यात जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी एकत्रितपणे बसतील”, अशी सूचक प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. त्यानंतर संजय राऊत यांनी महत्त्वाची माहिती दिली.

इंडिया आघाडीच्या समन्वयक समितीची उद्या महत्त्वाची बैठक आहे. त्या बैठकीला 13 जणांची समिती उपस्थित राहून तिथे अनेक निर्णय होतील. काही नवीन विषय समोर आलेले आहेत.

महाराष्ट्र हे महत्त्वाचं राज्य असल्यामुळे महाविकास आघाडीच्या संदर्भातील काही महत्त्वाचे मुद्दे चर्चेत आले. त्या संदर्भात कोणते विषय घ्यावेत, पुढे जावेत याबाबत चर्चा झाली”, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

“या चर्चेनंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांशी दुरध्वनीवर चर्चा केली. कारण काँग्रेस नेते नाना पटोले आणि इतर नेते त्यांच्या पक्षाच्या एका यात्रेत सहभागी आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत फोनवर चर्चा केली”, असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

महाराष्ट्रातील अनेक मुद्दे आहेत. महाराष्ट्रात दुष्काळ आहे, मराठा समाजाच्या आंदोलनाला वेगळं वळण घेतलं आहे, सरकार अपयशी आहे. सरकारने विशेष अधिवेशन का बोलावलं आहे या संदर्भात सर्वात जास्त संभ्रम महाराष्ट्रात आहे.

नाना पटोले यांनी भूमिका मांडलीय की महाराष्ट्र तोडण्यासाठी हे अधिवेशन आहे. अनेक विषय आहेत. त्यावर चर्चा झाली”, अशी देखील माहिती संजय राऊत यांनी दिली.(स्रोत:tv9मराठी)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उद्धव ठाकरेशरद पवार

संबंधित बातम्या

नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 13, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 13, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
Next Post
जालन्याच्या घटनेचे राज्यभरात पडसाद; उद्या मंगळवेढ्यात सरकारचा निषेध नोंदवण्यात येणार

मोठी बातमी! सकल मराठा समाजाच्या वतीने आज मंगळवेढ्यात सर्व शासकीय संस्था, शाळा, महाविद्यालय, बँक, खाजगी संस्था, एस टी बंदचे आवाहन

ताज्या बातम्या

नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 13, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 13, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..