मंगळवेढा टाईम्स टीम । पुणे शहरात पहिल्यांदाच यंदाच्या मोसमातील मान्सूनच्या पावसाने बुधवारी जोरदार हजेरी लावली . यंदाच्या मोसमात राज्यभरात मान्सून व्यापल्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये पावसाने बुधवारी दमदार हजेरी लावली. Heavy rains in Pune district
शहरातील जवळपास सर्वच भागांना पावसाने चांगलेच झोडपून सकाळपासूनच शहरात मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत होता. त्याचबरोबर आकाशात ढगही दाटून आले होते. दुपारच्या सुमारास अधूनमधून पावसाचे थेंब पड़त होते.
मात्र , त्यानंतर संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास शहरातील अनेक भागांमध्ये अचानक अंधारुन येऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली. यावेळी कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या लोकांची चांगलीच तारांबळ उडाली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज