mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खळबळ! पोलिस भरतीत काॅपीचा असाही प्रकार; त्या तरुणाचा आधुनिक कॉपीचा प्रकार असा झाला उघड

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 20, 2021
in राज्य, क्राईम
संतापजनक! मंगळवेढ्यात जन्मदात्या आईनेच केला मुलीचा खून

टीम मंगळवेढा टाईम्स। 

सध्या राज्यभर पोलिस भरती प्रक्रिया सुरु आहे. त्यात पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील ७२० जागांसाठी काल लेखी परीक्षा झाली.

या परिक्षेत मास्क मोबाईलव्दारे कॉपी करण्याचा एका परीक्षार्थी तरुणाचा प्रयत्न दक्ष पोलिसांमुळे हिंजवडीमध्ये (ता.मुळशी,जि.पुणे) फसला.

मास्कमध्ये दडविलेल्या या डिव्हाईसमधून तो कॉपी करणार होता. पण, तपासणीत या तरुणाचा मास्क खूपच जड वाटल्याने पोलिसांना संशय आला. त्यातून हा आधुनिक कॉपीचा प्रकार उघड झाला आहे.

दरम्यान, ओळखपत्र राहिले अशी सबब सांगून सदर परीक्षार्थी पसार झाला. त्याचा पोलिस शोध घेत आहेत. त्याच्याविरुद्ध कॉपी केल्याचा गुन्हा नोंदवला जाणार असल्याचे हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडमधील ७२० पोलिस शिपायांच्या जागांसाठी राज्यभरातील तब्बल एक लाख ८९ हजार ७३२ जणांनी अर्ज केले होते. त्यांच्यासाठी पिंपरी-चिंचवड, पुणे, नाशिक, नगर, औरंगाबाद,

सोलापूर, नागपूर या शहरातील ४४४ केद्रांवर शंभर गुणांची लेखी परिक्षा शुक्रवारी दुपारी 3 ते 4:30 या वेळेत झाली. त्यासाठी तब्बल १२ हजार ६९६ पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

त्यात एक अतिरिक्त आयुक्त, एक उपायुक्त,१५ एसीपी, तेवढेच पोलिस निरीक्षक आणि १७७ उपनिरीक्षक तथा फौजदारांचा समावेश होता.

या परीक्षेत कॉपी होऊ नये म्हणून परीक्षार्थींना हाफ बाह्यांचे शर्ट घालण्याची पूर्वसूचना देण्यात आली होती. तसेच, त्यांच्या चपला, बूटं परीक्षा खोलीबाहेरच काढून घेण्यात आली.

मोबाईल, ब्लू टूथ, स्मार्ट वॉच आदी इलेक्ट्रॉनिक उपकरणे परीक्षा केद्रांत नेण्यास मज्जाव करण्यात आला होता. फक्त कोरोनामुळे मास्क बंधनकारक होता.

त्याचाच गैरफायदा एका परीक्षार्थीने घेतला. त्याने मास्कमध्ये इलेक्ट्राॅनिक बॅटरी मोबाईल सीमकार्ड बसवले. त्याव्दारे प्रश्नपत्रिका स्कॅन होऊन बाहेर इच्छित स्थळी दिसणार होती.

तेथून या कॉपीबहाद्दराला उत्तरे पुरविण्यात येणार होती. अशा जय्यत तयारीनिशी हा तरुण हिंजवडीतील ब्लू रिज पब्लिक स्कूल या परीक्षा केंद्रावर आला होता.

पिंपरी-चिंचवडमधील १ हजार २८८ परीक्षार्थी या केंद्रावर होते. मात्र, या कॉपीबहाद्दराचा बेत फसला. परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वीच्या तपासणीत त्याचा बनाव उघड झाला.

मात्र, प्रसंगावधान राखत हॉल तिकिट तथा परीक्षेचे ओळखपत्र विसरल्याचे दुसरा बनाव त्याने केला. तो, मात्र यशस्वी झाला.

आयडी आणण्यासाठीचे कारण सांगून गेला आणि तो परतलाच नाही. मात्र, त्याचा शोध घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचे स्थानिक हिंजवडी पोलिस ठाण्याचे प्रमुख सावंत यांनी सांगितले आहे.(स्रोत:सरकारनामा )

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पोलीस भरती

संबंधित बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मुलीचा संसार वाचवण्यासाठी सासू सरसावली; जावयाला किडनी दान करून दिले नवजीवन

August 4, 2026

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 4, 2026

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा! जबरदस्तीने धर्मांतरासाठी आता सात वर्षे कारावास; धर्मांतरविरोधी कायदा राज्यात लागू

August 4, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 2, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून सूट मिळणार नाही! मंगळवेढा न्यायालयात आरोपीला ३ वर्षांची ठोकली शिक्षा

July 31, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही! एफडीएचा शाळांना शेवटचा अल्टीमेटम; शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विकल्यास थेट कारवाई; तुकाराम मुंढेंची शाळांवर थेट धाड

July 30, 2026
Next Post
विद्यार्थ्यांनो! टीईटी आणि नेट परीक्षा एकाच दिवशी, एसटी संपामुळे उमेदवारांची गैरसोय; टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

विद्यार्थ्यांनो! टीईटी आणि नेट परीक्षा एकाच दिवशी, एसटी संपामुळे उमेदवारांची गैरसोय; टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

ताज्या बातम्या

स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

August 6, 2026
ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

August 6, 2026
आधारकार्ड घरी मागवून घेण्यासाठी फक्त 50 रुपये शुल्क भरावे लागणार

मतदारांना मोठी दिलासादायक बातमी! ‘एसआयआर’ अभियानासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ; सुधारित वेळापत्रक जाहीर

August 6, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणाची धग वाढणार! सोलापूर जिल्ह्यात मनोज जरांगे-पाटील यांच्या चार तोफधडक सभा

August 6, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

मंगळवेढ्यात कर्जमाफीचा मोठा धमाका! ‘त्या’ एकाच गावातील ३५६ शेतकऱ्यांना जॅकपॉट

August 5, 2026
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

नियम धाब्यावर बसवून वाळू उपसा भोवला! भीमा नदीतील वाळू ठेका रद्द; १ कोटी २० लाखांची ठेव जप्त, गुन्हे दाखल करण्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा झटका

August 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा