टीम मंगळवेढा टाईम्स।
आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी जमीन विकणाऱ्या वडिलांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून मिळवलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसवून मुलाने वडिलांनी शिक्षणासाठी घेतलेल्या कष्टाचे चीज तालुक्यातील बावची येथील श्रीकांत खांडेकर याने केल्याचे दाखवून दिले.
दक्षिण भागात दुष्काळी तालुक्याच्या दक्षिण भागातील बावची गावात जिरायत शेतीत केलेला खर्च परवडत नसल्याने मोलमजुरी करुन जगणाऱ्या बावची गावातील कुंडलिक खांडेकर यांनी आपल्या तीन मुलांना स्वत: अशिक्षित राहून शिक्षीत केले.
थोरल्या मुलाने मार्केटींगच्या माध्यमातून रोजगार मिळविला आणि दुसरा लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत उत्तीर्ण झाला तिसय्रा मुलाचे पदवीचे शिक्षण पुर्ण केले.
बावचीच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षण झाल्यानंतर निंबोणी इंग्लीश स्कूल मध्ये माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर सोलापूरच्या दयानंद महाविदयातून बारावी विज्ञान शिक्षण झाल्यानंतर
दापोलीच्या कृषी विदयापीठात कृषी अभियांत्रीकीचे शिक्षण घेत असताना आयआयटीत निवड झालेली सोडून केंद्रीय लोकसेवा आयोगाची पुणे व
नवी दिल्लीत तयारी सुरु करून पहिल्याच प्रयत्नात वनसेवा परिक्षेत देशात 33 वा क्रमांक व आय ए एस मध्ये 231 व्या क्रमांकाने यश मिळविले.
आय ए एस ला पसंती देत प्रशिक्षणानंतर जिल्हाधिकारी म्हणून बिहार राज्यातील पाटणा येथे कार्यरत असताना वडील कुंडलिक खांडेकर हे बिहार राज्यातील पाटणा येथे जावून
कार्यालयाची पाहणी करून मुलाचा कारभार पाहत असताना मुलाने देखील आपल्या खुर्चीवर वडिलाला बसून वडिलांनी आपल्यासाठी घेतलेल्या कष्टाचे आपण देखील चीज केल्याचे दाखवून देऊन वडिलांचा सन्मान केला.(स्रोत:सकाळ)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज