टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरात नवरात्र बंदोबस्ताकामी लावलेले बॅरेगेटस पाडून आत येणार्या मोटर सायकलस्वारास परवानगी नाही असे होमगार्ड म्हणताच तु मला ओळखले नाहीस का?
तुझी लायकी काय? असे म्हणून अंगावर येवून कर्तव्य बजावत असताना शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी रमेश विठोबा आसबे, अमर आबा आसबे (रा.मारापूर ) या दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, यातील फिर्यादी होमगार्ड आण्णासाहेब चंद्रकांत कांबळे हे त्यांच्या साथीदारासह रात्री 10.00 वा.मंगळवेढा शहरातील चोखामेळा चौकात जयभवानी नवरात्र महोत्सव मंडळ येथील पॉइंटवर बंदोबस्त करीत असताना
वरील दोघा आरोपींनी एम एच 13, डी.सी.3108 या प्लॅटिना मोटर सायकलवर येवून नवरात्र बंदोबस्तकामी लावलेले बॅरेगेटस पाडून आत आले.
यावेळी फिर्यादीने तुम्ही गाडी आत का आणली, आत जाणेस परवागनी नाही, तुमची गाडी बाहेर पार्क करा असे म्हणताच
आरोपींनी धक्काबुक्की करीत अटकाव करून तुम्ही आम्हास आत सोडा, तु मला ओळखत नाही का? तुमची लायकी नाही असे म्हणत
अंगावर येवून शासकिय कर्तव्य बजावत असताना अडवणूक करून शासकिय कामात अडथळा आणल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस हवालदार हजरत पठाण हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज