टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा येथील प्रांत कार्यालयाच्या गेटसमोर हँडल लॉक करून लावलेली ४० हजार रुपये किमतीची होंडा स्प्लेंडर गाडी चोरटयाने पळविल्याप्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी राहुल टाकणे (रा.शिवप्रेमी चौक) हे दुपारी २.३० वा.
कामानिमित्त प्रांत कार्यालयात मोटर सायकलवर आले होते. एम एच १३ , सी.एक्स ८०५८ ही गाडी प्रांत कार्यालयाच्या गेटजवळ लावून ते कार्यालयात गेले.
काम उरकून बाहेर आल्यानंतर सदर ठिकाणी गाडी दिसून आली नाही. गाडीचा आजूबाजूला सर्वत्र शोध घेतला मात्र ती न मिळाल्याने
चोरटयाने मुद्दाम लबाडीने चोरून नेल्याची खात्री पटल्याने अज्ञात चोरटयाविरूध्द फिर्याद दाखल करण्यात आली आहे. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज