टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाकाळात सोन्याच्या किंमतींनी मोठी उसळी घेतली आहे. पण येत्या दिवळापर्यंत हेच सोने 70000 वर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यंदा जानेवारी ते आतापर्यंत सोन्याने चांगला परतावा दिला आहे. अशावेळी सोन्यामध्ये गुंतवणूक करावी का? जाणून घेऊया तज्ज्ञ काय म्हणतात.
शुक्रवारी देशात सोन्याच्या किंमती 57000 रुपये प्रति 10 ग्रॅम होत्या. . एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार सोन्याच्या दरामध्ये सलग 16 व्या दिवशीही वाढ झाली आहे. काही तज्ज्ञांनुसार सोने 70000 रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. जेपी मॉर्गनच्या एका अहवालानुसार सोने पुढील दोन महिन्यांत 70000 रुपयांवर जाणार आहे. कोरोनाचे संकट जरी टळले तरीही जागतिक अर्थव्यवस्थेला आलेली मंदी एवढ्यात सुधरणारी नाही. यामुळे जेव्हा आर्थिक संकट सुरुच राहणार तेव्हा सोन्याची मागणी वाढत राहणार आहे.
सोन्यासोबत चांदीदेखील सारखी वाढत आहे. चांदीचा दर शुक्रवारी 576 रुपये प्रति किलो वाढून 77,840 रुपये किलो प्रति किलोग्रॅम झाला आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर शुक्रवारी 57008 प्रति तोळा झाला होता.
एचडीएफसी सिक्युरिटीचे वरिष्ठ अधिकारी तपन पटेल यांनी न्यूज एजन्सी पीटीआयला सांगितले की, दिल्लीच्या वायदा बाजारात सोन्याने नवीन उंची गाठली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी 2,062 डॉलर प्रति औंस व 28.36 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर व्यवहार करत होते.
मोतीलाल ओसवाल फाय़नान्स सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी सांगितले की, सोनो आणि चांदी सध्या कधी नव्हे तेवढ्या दरावर व्यापार करत आहेत. दोन्ही धातू नवनवीन उंची गाठत आहेत. मात्र, अजून यामध्ये वाढ होण्याची आशा आहे.
या साऱ्या तज्ज्ञांनुसार सोन्यामध्ये गुंतवणूक केल्यास निराश होणार नाही. जर आता कोणी गुंतवणूक केली आणि खरोखरच सोने दिवाळीपर्यंत 70000 च्या स्तरावर गेले तर दोन महिन्यांत 22 टक्के रिटर्न मिळणार आहे.
Gold likely to touch 70,000 by Diwali; Why invest?
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज