mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

जबरदस्त संधी! मंगळवेढ्यात शेळीपालन, गीर गाय व कुक्कूट पालन उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम; येथे करा संपर्क

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 7, 2021
in मंगळवेढा, शैक्षणिक
जबरदस्त संधी! मंगळवेढ्यात शेळीपालन, गीर गाय व कुक्कूट पालन उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम; येथे करा संपर्क

टीम मंगळवेढा टाईम्स ।

महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त श्री.विठ्ठल शिक्षण प्रसारक व क्रीडा मंडळ यांच्यावतीने सध्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने सांगितलेल्या मास्क वापरणे, फिजिकल डिस्टसिंग ठेवून सर्व नियमांचे पालन करून

बंदिस्त शेळीपालन, गीरगाय पालन व कुक्कूट पालन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून मंगळवेढा व परिसरातील शेतकरी, नवउद्योजक, सुशिक्षित बेरोजगार, युवक व महिला बचत गट यांना स्वयंरोजगार मिळणेसाठी तसेच

शेतीपूरक उद्योगांना चालना देवून प्रगतशील करणेसाठी व दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी, सुशिक्षित बेरोजगार महिला व पुरूष यांच्यासाठी दि.9 ऑक्टोंबर ते 11 ऑक्टोंबर 2021 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत

मंगळवेढा येथील शिशुविहार श्रीराम मंगल कार्यालयासमोर मंगळवेढा येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेच्या मुख्याधिकारी डॉ.साधना उगले (मो.8208404208) व कार्यक्रम समन्वयक पार्थ दुपडे (मो.9011952003) यांनी दिली.

सध्या सेंद्रिय दुधाची वाढती मागणी, लोकांचे देशी गाईचे दूध खाण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता देशी गायी पालनाला खूप महत्व प्राप्त झाले आहे. म्हणूनच बरेच शेतकरी या व्यवसायाकडे वळत आहेत.

या तांत्रिक प्रशिक्षणामध्ये गीरगाय पालन, कुक्कूट पालन व शेळीपालन यामध्ये  जाती, निवड व प्रजनन, गीरगाय, कुक्कूट व शेळ्यांचा आहार, गोठा व्यवस्थापन (निवारा), चारा साठवण पध्दत, आजार, उपचार व नियंत्रण, शेळ्यांचे दूध-उपयोग, या सर्वाचे अर्थशास्त्र, या विषयी माहिती मिळणार आहे.

तसेच उद्योजकीय प्रशिक्षणामध्ये प्रभावी संवाद कौशल्य, कार्पोरेट मार्केटिंग, उद्योजकीय व्यक्तीमत्व विकास, बाजारपेठ पाहणी, विक्री कौशल्य, गीरगाय, कुक्कूट व शेळी पालन पूरक उद्योगातील संधी, शासकीय व निमशासकीय कर्ज योजना व अनुदानाची माहिती,

जिल्हा उद्योग केंद्राच्या व नाबार्डच्या विविध योजनांची माहिती व प्रकल्प अहवाल तयार करणे आदि माहिती या प्रशिक्षणातून दिली जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील युवकांमध्ये स्वत:च्या व्यवसायाविषयी जनजागृती होणार आहे.

निसर्ग व पाणी यामुळे शेतकरी सतत अडचणीत येत आहेत. त्यामुळे शेती व्यवसाय हा उद्योग म्हणून उभारणी घेत नसल्याने यास पर्याय म्हणून पशुधन जोपासणे काळाची गरज आहे.

कमी चारा, कमी पाण्यात व कमी जागेत हा उद्योग प्रशिक्षण घेवून केल्यास बेरोजगारीची गंभीर समस्या मिटून शेतकरी व सुशिक्षित बेरोजगार यांना उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध होत आहे.

या प्रशिक्षणासाठी पात्रता म्हणजे व्यवसाय करण्याची तीव्र इच्छाशक्ती आवश्यक आहे. या प्रशिक्षणासाठी फक्त 20 जागाच असणार आहेत. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे मर्यादित जागा असणारे हे प्रशिक्षण घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क करावा, असे आवाहन डॉ.साधना उगले यांनी केले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शेळी पालन

संबंधित बातम्या

महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट! बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाचे ४३ हजार लांबवले; मंगळवेढा बसस्थानकावरील CCTV कॅमेरे पडले बिनकामी

August 1, 2026
गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून सूट मिळणार नाही! मंगळवेढा न्यायालयात आरोपीला ३ वर्षांची ठोकली शिक्षा

July 31, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 29, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

वाटचाल सोनपावलांची! जयश्री महिला अर्बन बँकेचा आज पहिला वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व ६ वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

July 28, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणी वाहून जातंय अन् पिके करपताहेत! भीमा काठच्या शेतकऱ्यांसाठी ८ तास विजेची आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

July 27, 2026
मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

July 26, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

मोजकेच प्लॉट शिल्लक! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

August 3, 2026
Next Post
तरुणांनो! घरबसल्या पैसे कमावण्याची व शिकण्याची संधी; दररोज मिळणार पगार

तरुणांनो! घरबसल्या पैसे कमावण्याची व शिकण्याची संधी; दररोज मिळणार पगार

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मुलीचा संसार वाचवण्यासाठी सासू सरसावली; जावयाला किडनी दान करून दिले नवजीवन

August 4, 2026

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 4, 2026

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा! जबरदस्तीने धर्मांतरासाठी आता सात वर्षे कारावास; धर्मांतरविरोधी कायदा राज्यात लागू

August 4, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा