टीम मंगळवेढा टाईम्स ।
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने डॉ.शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उद्या रविवार दि.19 फेब्रुवारी रोजी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती संचालक डॉ.शरद शिर्के यांनी दिली आहे.
मुरलीधर चौक आय.सी.आय.सी.आय बँकेसमोर शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आय.सी.यु अँड एल.एल.पी येथे सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत शिबीर सुरू राहणार आहे.
या शिबिरामध्ये फक्त 500 रुपयांत सोनोग्राफी करण्यात येणार आहे तर 15 दिवसांची (कॅल्शियम व रक्तवाढीची) औषधे मोफत देण्यात येणार आहेत.
गरोदर मातांची मोफत तपासणी व उपचार, रक्त, लघवी तपासणीवर 10 टक्के सवलत दिली जाणार आहे. शिबिरामध्ये नोंद केलेल्या पेंशटला पुढील उपचारासाठी व शस्त्रक्रिया साठी सवलत देण्यात येईल.
वेदना विरहित बाळंतपणाची सोय व मार्गदर्शन, गर्भाशयाच्या पिशवीच्या समस्या, मासिक पाळीच्या त्रास, मुलीच्या समस्या व उपचार आणि वंध्यत्व तपासणी व उपचार केले जाणार आहेत.
रविवारी होणाऱ्या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हान शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज