टीम मंगळवेढा टाईम्स ।
एका वृद्ध महिलेची ४ एकर ३७ गुंठे शेतीचे तहसील कार्यालयात खोटी, बनावट व किमती कागदपत्रे बनवून त्या कागदपत्रांच्या आधारे बनावट वाटणीपत्र करून स्वतःच्या नावावर करून फसवणूक केल्याचा प्रकार गादेगाव (ता. पंढरपूर) येथे घडला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शांतीनाथ गंगाराम बागल (रा. गादेगाव, ता. पंढरपूर) याने सीताबाई विष्णू बागल (वय ६२, रा. गादेगाव, ता. पंढरपूर) यांचा सख्खा पुतण्या असल्याचे दाखवले.
सीताबाई विष्णू बागल व त्यांच्या मयत पतीस लिहिता-वाचता येत नाही. याचा गैरफायदा घेऊन सीताबाईची जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली आहे. त्
यानंतर ती शेतजमिनही शांतीनाथ बागल याने त्याचा मुलगा सयाजीराजे शांतीनाथ बागल याचे नावे केली अन् अ.पा.क. म्हणून यातील शांतीनाथ बागल याने त्याची पत्नी सुरेखा शांतीनाथ बागल हिचे नाव लावले आहे.
सीताबाई बागल यांची वडिलोपार्जित असलेली शेती गट नं. ६१४, ६१५, ६१८ अशी असून त्यांचे सीताबाईचा नवरा विष्णू बागल व सीताबाईच्या दिरामध्ये झालेल्या वाटपाचे फेरफार सीताबाईने काढून आणले आहेत. त्यामध्ये यातील शांतीनाथ याचे वडिलांचे अगर आजोबांचे नाव नाही.
यातील शांतीनाथ हा नात्याने सीताबाईचा कोणीही लागत नसताना त्याने तहसील कार्यालयात खोटी, बनावट व किमती कागदपत्रे बनवून त्या कागदपत्रांच्या आधारे बनावट वाटणीपत्र करून फिर्यादीची गादेगाव (ता. पंढरपूर) येथील
शेती गट नं. ६१४/१, ६१४/२, ६१५/३, ६१८ मधील एकूण ४ एकर ३७ गुंठे शेती त्यांचे नावावर करून आमची फसवणूक केली आहे, असा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोसई दिलीप शिंदे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज