टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूरच्या ग्रामीण भागात सोमवारी 57 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुळे चौघांचा मृत्यू झाल्याचेही अहवालातून स्पष्ट झाले आहे. सोमवारी एकाच दिवशी 123 कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
सोमवारी कोरोना चाचणीचे 1 हजार 123 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 1 हजार 66 अहवाल निगेटिव्ह आले असून 57 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या आता 36 हजार 979 झाली आहे. आजपर्यंत 1 हजार 89 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सध्या रुग्णालयात सध्या 1 हजार 34 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागातील 34 हजार 856 जण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.
सोमवारी आलेल्या अहवालामध्ये मृत दाखविण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये
माळशिरस तालुक्यातील विझोरी येथील साठ वर्षिय पुरुष, पंढरपूर तालुक्यातील इसबावी येथील 55 वर्षीय महिला,
बार्शीतील दत्तनगर येथील 75 वर्षिय पुरुष, पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील 70 वर्षिय महिला यांचा समावेश आहे. कोरोना चाचणीचे 37 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज