mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

तिकडे वडील फडणवीसांच्या खांद्याला खांदा लावून स्टेजवर; पण इकडे दोन्ही मुलांनी शरद पवार गटाच्या उमेदवारीसाठी दिली मुलाखत; तुतरीचाच प्रचार करणार? राजकीय घडामोडींना वेग

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 9, 2024
in राजकारण, राज्य
तिकडे वडील फडणवीसांच्या खांद्याला खांदा लावून स्टेजवर; पण इकडे दोन्ही मुलांनी शरद पवार गटाच्या उमेदवारीसाठी दिली मुलाखत; तुतरीचाच प्रचार करणार? राजकीय घडामोडींना वेग

टीम मंगळवेढा टाईम्स ।

शरद पवारांची साथ सोडून भाजपच्या गोटात सामील झालेले माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे हे जरी देवेंद्र फडणवीसांच्या स्टेजवर दिसत असले तरी त्यांच्या दोन्ही मुलांनी थेट तुतारीकडे उमेदवारीसाठी मुलाखत दिल्याने भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

लक्ष्मण ढोबळे हे पवारांसोबत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अनेक वर्ष मंत्री म्हणून दिसले होते. राज्यात सत्तांतर झाल्यावर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना साथ देत भाजपमध्ये प्रवेश केला.

यानंतर भाजपने त्यांना म्हणावा असा न्याय तर दिलाच नाही मात्र पक्षाचे प्रवक्ते म्हणून त्यांची नियुक्ती केल्याने हा फायर ब्रँड नेताही अडगळीत पडला होता.

ढोबळे यांचा वापर भाजपने शरद पवार आणि त्यांच्या गटावर टीका करण्यासाठी करून घेतला होता आणि त्यामुळेच त्यांना प्रवक्ते पद ही देण्यात आले होते.

सध्यातरी ढोबळे यांनी अजूनही भाजपवर निष्ठा ठेवत काम सुरू ठेवले असले तरी त्यांची कन्या कोमल आणि मुलगा अभिजीत यांनी भाजप आणि फडणवीस यांच्यासोबत न राहता शरद पवार यांना साथ देणे पसंत केले आहे. मंगळवारी पुणे येथे झालेल्या शरद पवार गटाच्या मुलाखतीत भाग घेत फडणवीसांपेक्षा पवार चांगले हे दाखवून दिले आहे.

ढोबळे यांची कन्या कोमल ढोबळे-साळुंखे व शाहू सूतगिरणीचे अध्यक्ष असलेले त्यांचे पुत्र अभिजीत ढोबळे यांनी माळशिरस व मोहोळ या दोन राखीव मतदार संघासाठी मुलाखती दिलेल्या आहेत.

सध्या मोहोळमध्ये अजित पवार गटाचे यशवंत माने हे आमदार असून त्यांच्या विरोधात भाजपमधून पवार गटाकडे गेलेले संजय क्षिरसागर हे प्रमुख चर्चेतले उमेदवार आहेत.

याशिवाय मोहोळचे माजी आमदार रमेश कदम, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे राजू खरे यांनीही मोहोळसाठी मुलाखती दिली असल्या तरी ढोबळे यांच्या दोन्ही मुलांनी दिलेल्या मुलाखतीमुळे राजकीय घडामोडी वेगाने घडू लागले आहेत.

कोमल ढोबळे यांनी मुलाखत दिल्याने चर्चांना जोर

कोमल ढोबळे या भाजपवर नाराज होत्या आणि त्या पक्ष बदलणार याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. सुरुवातीला त्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश करणार असे वातावरण बनले असताना आता कोमल ढोबळे यांनी थेट तुतारीकडे उमेदवारीसाठी मागणी करीत मुलाखत दिल्याने चर्चेला जोर आलेला आहे.

कोमल यांचे बंधू अभिजीत यानेही मोहोळ व माळशिरस या दोन मतदारसंघासाठी मुलाखत दिली आहे. यावेळी सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त उमेदवारीची मागणी ही शरद पवार यांच्या तुतारीकडे होऊ लागल्याने पवारांची जादू वाढत चालल्याचे दिसत आहे. याबाबत अजून लक्ष्मण ढोबळे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी ढोबळ्यांची मुलं मात्र तुतरीचाच प्रचार करणार हे दिसू लागले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अभिजित ढोबळेकोमल ढोबळे-साळुंखे

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला! मतदार यादीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर; ‘या’ तारखेला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी

July 16, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

अजित पवारांच्या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष आणि थोर पुरुषांच्या यादीत, दादांची जयंती शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयात साजरी होणार; ‘या’ तारखेला राज्यभर पहिली शासकीय जयंती

July 16, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

कर्जमाफीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा, शेतकऱ्यांची वीजबिलाची पाटी कोरी केली, जुनं वीजबिलही…

July 15, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडक्या बहिणीं’ची प्रतीक्षा वाढली! जूनचा हप्ता जमा न झाल्याने महिलांची बँकेत चकरा; कधी मिळणार पैसे? लगेच करा ‘हे’ काम; अन्यथा हप्ता अडकू शकतो

July 15, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

भयंकर! लग्नामध्ये सत्कारात नाव पुकारला नाही, रागाच्या भरात तलाठ्यानं तरुणाच्या डोक्यात टाकला लोखंडी माईक

July 14, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

भेसळीच्या विळख्यातून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी तुकाराम मुंढेंचा ‘हा’ मास्टरप्लॅन; नागरिकांना केली मोठी विनंती

July 14, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी गूडन्यूज! कर्जमाफीच्या दोन अटी केल्या रद्द, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कुणाला मिळणार फायदा?

July 12, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडकी बहीण’ योजनेचे पैसे वाढणार? मोदींच्या सल्लागार परिषदेचा मोठा अहवाल; पण ‘या’ महिलांसाठी चिंतेची बातमी

July 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आ.समाधान आवताडेंचा धडाका! मंगळवेढ्याला म्हैसाळचे, तर पंढरपूरला कॅनॉलद्वारे मिळणार पाणी; वीज पुरवठाही ८ तास होणार

July 10, 2026
Next Post
भारताचा कोहिनूर हरपला! उद्योगपती रतन टाटा यांचे निधन; वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अख्खा देश गहिवरला, कोट्यवधी भारतीयांच्या डोळ्यात पाणी

भारताचा कोहिनूर हरपला! उद्योगपती रतन टाटा यांचे निधन; वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अख्खा देश गहिवरला, कोट्यवधी भारतीयांच्या डोळ्यात पाणी

ताज्या बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! पंढरपुरात आषाढी वारीच्या तोंडावर खळबळ; ‘या’ प्रसिद्ध मिसळ सेंटरसह हॉटेल्सवर तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; तक्रारींसाठी नागरिकांनी ‘या’ क्रमांकावर संपर्क साधावा

July 16, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांसाठी देवमाणूस ठरले आ.समाधान आवताडे! उजनी आणि म्हैसाळमधून थेट शेतात पोहोचणार पाणी

July 16, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला! मतदार यादीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर; ‘या’ तारखेला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी

July 16, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

अजित पवारांच्या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष आणि थोर पुरुषांच्या यादीत, दादांची जयंती शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयात साजरी होणार; ‘या’ तारखेला राज्यभर पहिली शासकीय जयंती

July 16, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! मॉलमध्ये काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणाचा भीमा नदीच्या पुलावरून पडून मृत्यू; घातपाताचा संशय?

July 16, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

कर्जमाफीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा, शेतकऱ्यांची वीजबिलाची पाटी कोरी केली, जुनं वीजबिलही…

July 15, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..