mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी खळबळ! शंभर कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ईडीकडून अटक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 2, 2021
in क्राईम, राजकारण, राज्य
कोरोना काळात नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेल्यांबाबत गृहमंत्री अनिल देशमुखांची मोठी घोषणा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तब्बल तेरा तासाच्या चौकशीनंतर, आज मध्यरात्री ईडी (ED) कडून अटक झाल्याची मोठी बातमी समोर येत आहे.

१०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांनंतर गेली अनेक दिवस देशमुख हे गायब झाले होते. सोबतच याच काळात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व ज्यांनी देशमुखांवर हे गंभीर आरोप केले ते, परमवीर सिंग हे देखील गेल्या अनेक दिवसांपासून गायब आहेत.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी शंभर कोटींच्या खंडणी वसुलीचे आरोप केले होते. त्या प्रकरणात ईडीने तपास सुरू केल्यानंतर अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.

दरम्यान, चौकशी सुरू असताना अनेक वेळा अनिल देशमुख यांना समन्स बजावण्यात आला होता.

वारंवार अनिल देशमुख हे वयाची व तब्येतीची कारणं देत चौकशीला गैरहजर राहिले. त्यानंतर त्यांच्या नावे लूक आऊट नोटीसही जारी करण्यात आली होती.

परंतु अनिल देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून गायब असल्याचं पाहायला मिळत होतं. आता अचानकच अनिल देशमुख हे ईडी कार्यालयात काल सकाळी 11:30 च्या सुमारास चौकशीसाठी हजर झाले.

अनिल देशमुख यांची ईडी कार्यालयात तब्बल 13 तास चौकशी झाली. त्यानंतर वेगवेगळ्या कलमान्वये त्यांच्यावर अटकेची कारवाई ईडीने केली आहे.

दरम्यान, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात असून आज सकाळी त्यांना ईडीच्या विशेष न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे

काल झालेल्या 13 तासांच्या चौकशीदरम्यान अनिल देशमुख चौकशीला कोणत्याही प्रकारे सहकार्य करत नव्हते, अशी माहिती देखील समोर येत आहे.

त्याचबरोबर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने तब्बल पाच वेळा समन्स बजावूनही अनिल देशमुख चौकशीला गैरहजर राहिले होते. दरम्यान, यापूर्वी अनिल देशमुख यांच्या स्वीय सहाय्यकांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. आता अनिल देशमुखांवरही अटकेची कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अटकगृहमंत्री अनिल देशमुख
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘या’ महिन्यांनंतर होणार; निवडणूक आयोगाचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापज्ञ

नागरिकांनो! आता मतदार यादीत नाव शोधण्याची सुविधा; ‘हे’ ॲप करा डाउनलोड

July 5, 2022
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरुच; आज पुन्हा दर कडाडले; एक लिटरसाठी किती रुपये मोजाल?

सामान्यांना दिलासा! राज्यात पेट्रोल व डिझेल स्वस्त होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; ‘इतक्या’ रुपयांनी कमी होणार?

July 4, 2022
Breaking! मंगळवेढ्यातील डॉक्टरचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चिडलेल्या नागरीकांनी दिला चाेप; पोलिसांनी केले त्याला गजाआड

Breaking! मंगळवेढ्यातील डॉक्टरचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चिडलेल्या नागरीकांनी दिला चाेप; पोलिसांनी केले त्याला गजाआड

July 4, 2022
चुकीला माफी नाही! मंगळवेढा पोलीस ठाण्याचा ‘हा’ हवालदार निलंबित; पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची कारवाई

चुकीला माफी नाही! मंगळवेढा पोलीस ठाण्याचा ‘हा’ हवालदार निलंबित; पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची कारवाई

July 3, 2022
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

July 4, 2022
मोठी बातमी! भाजपचे धक्कातंत्र; आज एकनाथ शिंदे घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

गुप्तता! सोलापूरच्या मंत्रिपदासाठीही आता धक्कातंत्र? आमदारांनी लावली फिल्डिंग

July 2, 2022
मंगळवेढा ब्रेकिंग! ‘या’ कारणांवरून नवऱ्याला बायकोसह तिच्या नातेवाईकांनी मारहाण करून लाथाबुक्क्यांनी तुडवले

संतापजनक! मुलीशी भांडण का करतो म्हणत सासू-सासऱ्यांनी जावयाला 8 दिवस ठेवलं डांबून; तलवारी पट्ट्याने केली मारहाण

July 2, 2022
संतापजनक! मंगळवेढयात एका शिक्षकाने विदयार्थ्यावर केले अनैसर्गिक कृत्य, मुलाला ठार मारण्याची दिली धमकी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मंगळवेढ्यात अवैध चंदनतोड प्रकरणी तरुणाला रंगेहाथ पकडले; आरोपीस ६ दिवसांची फॉरेस्ट कस्टडी

July 2, 2022
शेतकऱ्यांचा राजवाडा आ.आवताडे यांनी प्रायव्हेट करण्याचा घाट घातला होता; अजित जगताप यांचा खळबळजनक आरोप

शेतकऱ्यांचा राजवाडा आ.आवताडे यांनी प्रायव्हेट करण्याचा घाट घातला होता; अजित जगताप यांचा खळबळजनक आरोप

July 1, 2022
Next Post
सर्वात वेगवान इंटरनेट सेवा सोबत फ्री कॉलिंग आता मंगळवेढयात; घर, ऑफिस, शाळा व उद्योगधंद्यासाठी आजच बुक करा

सांगोलाकरांना मिळणार आता सर्वात वेगवान इंटरनेट सेवा; बीएसएनएल फायबरची सेवा सांगोल्यात उपलब्ध

ताज्या बातम्या

मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘या’ महिन्यांनंतर होणार; निवडणूक आयोगाचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापज्ञ

नागरिकांनो! आता मतदार यादीत नाव शोधण्याची सुविधा; ‘हे’ ॲप करा डाउनलोड

July 5, 2022
कारखाना सुसाट चालणार! आ.आवताडे गटाच्या उमेदवारांनी जाणून घेतल्या सभासदांच्या वयक्तिक अडचणी; ‘या’ तारखेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची सभा होण्याची शक्यता

कारखाना सुसाट चालणार! आ.आवताडे गटाच्या उमेदवारांनी जाणून घेतल्या सभासदांच्या वयक्तिक अडचणी; ‘या’ तारखेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची सभा होण्याची शक्यता

July 4, 2022
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरुच; आज पुन्हा दर कडाडले; एक लिटरसाठी किती रुपये मोजाल?

सामान्यांना दिलासा! राज्यात पेट्रोल व डिझेल स्वस्त होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; ‘इतक्या’ रुपयांनी कमी होणार?

July 4, 2022
धाडस! वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर भीमा नदीत बुडाला; मोठी दुर्घटना टळली

जिल्हाधिकारी साहेब! वाळू ठेक्याची मुदत संपूनही वाळूचा उपसा, चित्रीकरण आलं समोर; कारवाई का नाही?

July 4, 2022
Breaking! मंगळवेढ्यातील डॉक्टरचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चिडलेल्या नागरीकांनी दिला चाेप; पोलिसांनी केले त्याला गजाआड

Breaking! मंगळवेढ्यातील डॉक्टरचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चिडलेल्या नागरीकांनी दिला चाेप; पोलिसांनी केले त्याला गजाआड

July 4, 2022
मोठी बातमी! दामाजी निवडणुकीत आ.आवताडे गटाचे पारडे जड; ‘या’ संघटनेने दिला पाठिंबा

मोठी बातमी! दामाजी निवडणुकीत आ.आवताडे गटाचे पारडे जड; ‘या’ संघटनेने दिला पाठिंबा

July 3, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..