मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यासंदर्भात वेगवेगळी चर्चा चालू आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांतील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी हे एकत्रिकरण व्हायला हवं, असं उघडपणे बोलून दाखवलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आता याच चर्चेवर थेट भाष्य केलंय. कुटुंब म्हणून सुख-दुखा:च्या काळात आम्ही एकत्र येतोच, असं त्यांनी म्हटलंय.
माझ्या मुलाच्या साखरपुड्याला…
अजित पवार यांनी पत्रकारांना वेगवेगोळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. याच वेळी भविष्यात अजित पवार आणि शरद पवार यांचे दोन्ही पक्ष एकत्र येतील का? असे अजित पवार यांना विचारण्यात आले. यावर बोलताना अजितदादांनी थेट उत्तर दिलं.
माझ्या मुलाच्या साखरपुड्याला ते सगळे आले होते. घरातले कार्यक्रम असतील तर आम्ही जातोच, असं अजित पवार यांनी सांगितलं. तसेच, विचारधारा वेगवेगळी आहे. पण कुटुंब म्हणून सुख दुखा:त आपण एकमेकांसोबत असतोच, असेही अजित पवार यांनी सांगितले आहे.
अनेकांनी एकत्रिकरणाची व्यक्त केली होती इच्छा
गेल्या काही दिवसांत अजित पवार आणि शरद पवार हे अनेकवेळा एकत्र आलेले आहे. वेगवेगळ्या कौटुंबिक कार्यक्रमामुळे तसेच इतर बैठकांत शरद पवार आणि अजित पवार आजूबाजूला बसलेले पाहायला मिळाले.
विशेष म्हणजे खासदार सुप्रिया सुळे, पवार घराण्यातीलच आमदार रोहित पवार यांनी थेटपणे एकत्रिकरण व्हायला पाहिजे, अशी भावना व्यक्त केली. त्यानंतर अजित पवार यांच्या गटातील नेते छगन भुजबळ यांनीदेखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मला आनंदच होईल, अशी भावना व्यक्त केली होती.
शरद पवार यांनी काय उत्तर दिलं होतं?
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना या एकत्रिकरणाबाबत विचारलं होतं. त्यांनी मात्र मला काहीही माहिती नाही, असं उत्तर दिलं होतं. आता अजित पवार यांनीही कौटुंबिक कार्यक्रमात आम्ही एकत्र येतोच, असं भाष्य केलंय. सध्या अजित पवार यांनी आमच्या विचारधारा एक आहेत, असं म्हटलं असली तरी आगामी काळात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज