टीम मंगळवेढा टाइम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील लोणार येथे शेतातील विहिरीवरील रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेवून कृषीपंपाचा स्टार्टर व केबल चोरणार्या चोरटयास शेतकर्यांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
दरम्यान 1500 रुपये किमतीचा स्टार्टर व केबल चोरीप्रकरणी नवनाथ केराप्पा होळकर याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी बबन नरळे यांची लोणार येथे शेती असून दि.29 रोजी रात्रीचे जेवण करून ते व त्यांचा भाऊ सचिन नरळे रात्री 9.00 वा. शेतात मुक्कामी गेले होते.
त्यावेळी अंधारात वरील आरोपी मोटारीचे स्टार्टर खोलत असताना दिसला.या दोघांना संशय आल्याने त्यांनी बॅटरीच्या उजेडात पाहिले असता आरोपी नवनाथ होळकर याच्या हातामध्ये 50 फुट केबल व स्टार्टर असा 1500 रुपयाचा मुद्देमाल दिसून आला.
यावेळी अधिक चौकशी करीत असताना तो हिसका मारून अंधाराचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला.
फिर्यादीने आरडाओरड करताच इतर शेतकरी मदतीला धावून आले व त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने नवनाथ होळकर असे नाव सांगितले.
याला शेतकर्यांनी पकडून मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
दरम्यान,बागायत क्षेत्रामध्ये विहिर व बोअरवर विद्युत मोटारी पाण्यासाठी बसविल्या जातात.याचा चोरटे अनेक ठिकाणी गैर फायदा घेत आहेत.
रात्रीच्यावेळी पेटीची कुलपे तोडून स्टार्टर,अॅटो तसेच केबल आदींची चोरी केली जात आहे.पोलिसात तक्रारी करूनही त्याचा शोध लागत नसल्याने चोरटयांचे फावत आहे.
येथे मात्र चक्क शेतकर्यांनीच त्या चोरटयाला चोरी करताना रंगेहाथ पकडल्याने चोरटयामधून खळबळ उडाली आहे.
या पुढेही शेतकर्यांनी अशाच पध्दतीने जागरूक राहून होणार्या चोर्यांचा बंदोबस्त करावा अशा भावना व्यक्त होत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज