टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील सलगर (बु.) येथे समाईक शेतातील बांध फोडल्याच्या कारणावरून एकाच्या हाताला चावा घेवून जखमी केल्याच्या कारणावरून मल्लिकार्जून पावले, बसू पावले, द्राक्षाणी पावले या तीघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी काशिनाथ महादेव पावले यांची सलगर बु. येथे शेती असून आरोपींचीही शेताशेजारी शेती आहे.
दि.30 रोजी सकाळी 11.00 वा. यातील फिर्यादी शेतात गेल्यावर त्यांना आरोपीने ट्रॅक्टरने समाईक बांध नांगरल्याचा दिसला.
याचा जाब फिर्यादीने विचारल्यानंतर तू नेहमी बांधावरून तक्रार का करतो, तुला मस्ती आली आहे असे म्हणून शिवीगाळ करीत त्या तीघांनी मिळून फिर्यादीस खाली पाडून
डाव्या हाताच्या दंडावर व उजव्या हाताचे मनगटावर चावा घेवून जखमी केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले असून जखमीवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
———–
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज