mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

वाळू ठेकेदारांची उडाली झोप! शासनाने घातले कडक निर्बंध, मोठी वाहने नदीपात्रात नेण्यास प्रतिबंध; यांच्यावर असणार मोठी जबाबदारी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 2, 2022
in मंगळवेढा, सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील वाळू लिलावास अखेर मिळाला मुहूर्त; ‘या’ दिवसापासून ऑनलाइन प्रक्रिया

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राज्यशासनाने नव्याने आता वाळू धोरण आखले असून यामध्ये वाळूची अवैध वाहतुक रोखण्यासाठी तसेच शासनाचा महसुल वाढविण्यासाठी सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच वाळू वाहतुकीला कायदेशीर परवानगी देण्यात आली आहे.

इतरवेळेस वाळू वाहतुक आढळून आल्यास ती वाहतुक अवैध ठरवून त्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

नदीवरील रेल्वे व रस्ते पुलाच्या जवळपास 600 मीटर आणि 2000 फुटापर्यंत वाळू उत्खनन करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

तसेच वाळू उत्खननासाठी मोठी वाहने नदीपात्रात नेण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यामुळे वाळू ठेकेदारांनी आता वाळू गटाच्याृ मुख्य रस्त्यावर डेपो करुन वाळूचा साठा करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.

ज्याठिकाणी लिलाव झाला आहे आणि उत्खनन सुरु आहे. त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

दर पंधरा दिवसाला याच्या फुटेजचे चित्रिकरण संबधित तालुक्याच्या तहसीलदारांकडे जमा करण्याचा सूचनाही शासनाच्यातवीने करण्यात आल्या आहेत.

वाळू वाहतुकीसाठी वाळू ठेक्यापासून बाहेर पडण्यासाठी एकच रस्ता ठेवण्याच्या सूचनाही आहे.

गाव कामगार तलाठी, मंडळ अधिकारी तहसीलदार, प्रांताधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकार्‍यांनी ज्या-ज्या भागात वाळू उत्खनन सुरु आहे. त्याठिकाणी अचानक भेट देवून त्याची नोंद ठेवण्याचा सूचना आहेत.

वाळू उत्खनन करण्यापूर्वी प्रशासनाच्यावतीने संबधित ठेकेदाराला वाळू साठ्याच्या ठिकाणी बेंच मार्क करुन तसेच हद्द कायम करुन ताबा देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

ज्याठिकाणी वाळू उत्खनन सुरु आहे, त्याचा मासिक अहवाल वरिष्ठ कार्यालयाला दर महिन्याला देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.

तो अहवाल नियमितपणे जिल्हाधिकार्‍यांनी शासनाच्या भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाचे संचालकांना सादर करण्याच्या सूचना आहेत.

अवैध वाळू उत्खन रोखण्यसाठी ग्रामपातळीवर ही दक्षता समिती नेमण्यात आली आहे.

यामध्ये सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील, कोतवाल आणि तलाटी हे सदस्य असणार आहेत. त्यामुळे आता वाळू ठेकेदारांना अनेक नियम व अटीच्या अधीन राहून वाळू उत्खनन करावे लागणार आहे.

तसेच ज्या तहसील अथवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत वाळू उत्खनन सुरु आहे, त्याठिकाणी असणार्‍या ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील आणि कोतवाल यांच्यावरही मोठी जबाबदारी असणार आहे.

ज्या भागात अवैध वाळू उत्खनन होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या भागातील कर्मचार्‍यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.

अवैध वाहतूक रोखण्यासाठी दक्षता पथके

अवैध वाळू वाहतुक रोखण्यासाठी आणि शासनाचा महसुल वाढविण्याच्या दृष्टीने आता जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता पथकांची नेमणूक करण्यात येणार आहे.

तसेच अवैध वाळू उत्खननामध्ये जर अधिकारी अथवा कर्मचारी सामील असतील तर त्यांच्यावर ही कडक कारवाई करण्याचे निर्देश शासनाने नव्या वाळू धोरणामध्ये दिले आहेत.

तसेच प्रत्येक ठिकाणी चेक पोस्ट स्थापन करण्यात येणार असून वाळू ठेक्यापासून मुख्यरस्त्यावर पर्यंतच रस्ता दिला जाणार आहे. तसेच या ठिकाणी 24 तास सीसीटिव्ही कॅमेर्‍याची नजर असणार आहे.

येणार्‍या तक्रारींच्या निराकरणासाठी समिती

वाळू लिलाव झाल्यानंतर ठेकेदारांना अनेक सामाजिक कार्यकर्तें तसेच शेतकरी अथवा सर्वसामान्य लोकांकडून तक्रारी केल्या जातात.

तसेच या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तसेच वाहतुकीला येणारे आडथळे दुर करण्यासाठी संबधित तालुक्याच्या तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात येणार असून आलेल्या तक्ररीचे 15 दिवसाच्या आता निराकरण करण्यात येणार आहे.

जर या ठिकाणी तक्रारदाराचे निराकरण नाही झाले तर त्याना वरिष्ठ समितीकडे दाद मागता येणार आहे.(स्रोत:पुढारी)

शासनाने नव्याने धोरण केले जाहिर

वाळू लिलावा संदर्भात शासनाने नव्याने धोरण जाहिर केले आहे. त्याची अमंलबजावणी आता सोलापूर जिल्ह्यात ही होणार आहे : संजीव जाधव अप्पर जिल्हाधिकारी, सोलापूर

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: वाळू लिलाव

संबंधित बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
Next Post

भाजप युवा मोर्चा कडून मंगळवेढा नगरपरिषदेत संबळनाद; टँकर वापरल्याप्रकरणी ठेकेदारकडून भाडे वसुलीची व कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा