टीम मंगळवेढा टाईम्स ।
आज धकाधकीच्या जीवनात आपल्याला स्वतःकडे पाहायला अजिबात वेळ नाही, आज जिमचा व्यायाम ही काळाची गरज बनली आहे, सिध्देश्वर आवताडे यांच्यामुळे मंगळवेढ्यात अत्याधुनिक जिम सुरू झाल्याचे प्रतिपादन उद्योजक जनार्धन शिवशरण यांनी केले आहे.
हर्ष फिटनेस अँड वेलनेसचे उद्घाटन जेष्ठ नेते बबनराव आवताडे यांच्या हस्ते झाले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्धन शिवशरण होते याप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिध्देश्वर आवताडे, तहसीलदार स्वप्नील रावडे,उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पोलिस निरिक्षक रणजित माने, गर्व्हनमेंट कॉन्ट्रॅक्टर सुशील आवताडे, कृषी उदयोग संघाचे चेअरमन शैलेश आवताडे, सरपंच जमीर सुतार, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख येताळा भगत, अँड.दत्तात्रय तोडकरी, हर्ष साबळे आदीजन उपस्थित होते.
जनार्धन शिवशरण पुढे बोलताना म्हणाले की, व्यायामाचा अभाव आणि असंतुलित आहार. यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांना काही ना काही आजाराने ग्रासले आहे, त्यामुळे आज जिमचा व्यायाम ही काळाची गरज बनली आहे.
पोट पुढे आलेली, हातापायाची काड्या झालेली, चेह-यावर तजेला नसलेली आणि पिस्टमय व प्रथिने यांची कमतरता असल्यामुळे शरीरांची वाढ झालेली नसते, रोगाशी सामना करू शकत नाहीत, असंतुलित आहारामुळे पोषण झालेले नसते त्यामुळे जिमची गरज असल्याचे जनार्धन शिवशरण यांनी सांगितले.
याप्रसंगी दामाजीचे संचालक गौरीशंकर बुरकूल, सोमनाथ बुरजे, पक्षनेते अजित जगताप, नगरसेवक प्रविण खवतोडे, अँड.श्रीरंग लाळे, प्रगतशील बागायतदार राकेश शिवशरण, माचणूर ग्रा.पं. सदस्य मनोज शिवशरण, बेगमपूर स्टेट बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर घनशाम धुवारे, दामाजी कारखान्याचे माजी संचालक राजू बाबर, माचनूरचे उपसरपंच उमेश डोके
स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मंगळवेढाचे मॅनेजर सुनिल बिडगर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत मुढे, प्रस्तावित हणमंत मासाळ व आभार निलेश साबळे यांनी मानले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज