टीम मंगळवेढा टाईम्स।
डेरवण ता. चिपळूण जि. रत्नागिरी येथे दिनांक १३ ते १६ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या ए आणि बी संघाने सहभाग नोंदवला होता.
या संघांमध्ये इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज मंगळवेढा येथील चार मुलींचा सहभाग होता. यामध्ये महाराष्ट्राच्या ए संघाचे कर्णधारपदाची धुरा प्रज्ञा बाळासो माने या विद्यार्थिनीकडे होती.
तर याच संघात श्रेया बाळासो माने हिची उत्कृष्ट खेळाडू म्हणून सहभागी होती. या दोघींनी अंतिम सामन्यात तामिळनाडू संघाला १५ गुणांनी पराभव करून महाराष्ट्राला सुवर्णपदकावर नाव करण्याची सुवर्णसंधी मिळवून दिली.
या स्पर्धेमध्ये एकूण २५ संघ सहभागी झाले होते. सदर स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून देण्यामध्ये मोठी कामगिरी केल्याबद्दल
विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सन्मान शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढाच्या संचालिका तेजस्विनी कदम यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच त्यांना स्पर्धेसाठी लागणारा खर्च संस्थेच्या वतीने देण्यात आला.
यामध्ये प्रामुख्यानं तामिळनाडू ,बिहार, पंजाब ,दिल्ली, तेलंगणा ,आंध्र, हिमाचल प्रदेश ,पश्चिम बंगाल, चंदिगड ,दिव दमण यांसारखे बलाढ्य संघ असताना,
महाराष्ट्राच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवण्याचे काम दोघी सख्या बहिणी ने केले आहे. याचा तमाम मंगळेकरांना अभिमान आहे.
मिश्र गटामध्ये सुद्धा महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळालेले आहे. यामध्ये सुद्धा मानेंचा सिंहाचा वाटा आहे. तसेच महाराष्ट्राच्या बी टीमने कांस्यपदकाची कमाई केली आहे.
तसेच आपल्या प्रशालेच्या दोन विद्यार्थिनी रिया रवींद्र क्षीरसागर आणि आकांक्षा महेश मोरे या दोघींनीही खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत महाराष्ट्र संघाला कांस्यपदक मिळवून दिले.
यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळचे उपाध्यक्ष डॉ.सुभाष कदम ,संस्थेच्या अकॅडमीक अॅडमिस्ट्रेटिव्ह डॉ.मिनाक्षी कदम, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. सुजित कदम, सचिवा प्रियदर्शनी महाडिक, संचालिका तथा उपप्राचार्या तेजस्विनी कदम ,
काॅलेजचे प्राचार्य रवींद्र काशीद, उपमुख्याध्यापक सुनील नागणे, पर्यवेक्षक राजू काझी,दिलीप चंदनशिवे ,सुहास माने,सोलापूर जिल्हा डॉजबॉल संघटनेचे सचिव मालप आदींनी अभिनंदन केले.
या सर्व खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शक दीपक शिनगारे, धनंजय यादव ,ज्ञानेश्वर मेटकरी, अमित जावळे, श्रीकांत काळुंगे, अण्णा वाकडे यांचे मार्गदर्शन लाभले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज