mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्याच्या डॉक्टर सुपुत्राची कमाल; वंध्यत्व निवारण शिबिरात ‘इतक्या’ जोडप्यांना मिळवून दिला लाभ

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 20, 2022
in आरोग्य, मंगळवेढा
मंगळवेढ्याच्या डॉक्टर सुपुत्राची कमाल; वंध्यत्व निवारण शिबिरात ‘इतक्या’ जोडप्यांना मिळवून दिला लाभ

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा येथील वंध्यत्व निवारण शिबिरात आई होऊ इच्छिणाऱ्या महिलांनी रेकॉर्डब्रेक गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. जवळपास 240 जोडप्यांना याचा लाभ घेता आला आहे.

श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती येथे सेवा देत असलेले आणि मुळचे मंगळवेढा तालुक्यातील असलेले डॉ.दत्तात्रय पाटील यांनी मंगळवेढ्यात मोफत वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन केले होते.

‘आई’ होण्यासाठी महिलांची विक्रमी गर्दी झाल्याचा पहिला अनुभव मंगळवेढ्यात आला असून वंध्यत्वाची समस्या किती वाढू लागली आहे याचेच दर्शन या गर्दीत झाले.

मातृत्वाशिवाय स्त्रीत्व अपुरे असते असे मानले जाते. प्रत्येक महिलेला आई होण्यात जो आनंद असतो त्या आनंदाची तुलना आयुष्यातील अन्य कुठल्याही आनंदाशी होत नाही.

परंतु अलीकडे वंध्यत्वाचे प्रमाण वाढताना दिसत असून आई होण्यापासून हे वंध्यत्व रोखत असते. त्यामुळे असे प्रत्येक जोडपे उदास होते आणि वाट्टेल ते प्रयत्न करू लागतात.

कितीही पैसा गेला तरी पर्वा नसते परंतु एखादे तरी अपत्य पदरी असावे ही अनावर इच्छा असते. विविध डॉक्टराकडून उपचार घेतले जातात, कुणाला यश येते तर कुणाच्या आयुष्यात ही निराशा कायम असते. कुणाला कधी कधी अत्यंत उशिरा अपत्यप्राप्ती होत असते.

मंगळवेढा येथील एका शिबिरात आई होऊ इच्छिणाऱ्या महिलांनी रेकॉर्डब्रेक गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती येथे सेवा देत असलेले आणि मुळचे मंगळवेढा तालुक्यातील असलेले डॉ.दत्तात्रय पाटील यांनी मंगळवेढ्यात मोफत वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन केले होते.

वीरशैव मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या या शिबारात आई बाबा होऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांनी विक्रमी गर्दी केली.

एका दिवसाच्या या शिबिरास सातारा, सोलापूर पासून दूर दूरवरून महिला पुरुष सहभागी झाले होते. डॉ.दत्तात्रय पाटील यांचे चांगलेच नाव असल्यामुळे लोकांनी मोठी गर्दी केली. या शिबिरात 240 जोडप्याना डॉ.पाटील यांनी व्यक्तिगत सल्ला दिला पण अनेकांना निराश होऊन परतावे लागले.

एक दिवसाचे मोफत शिबीर आणि गर्दी मात्र मोठी त्यामुळे सर्वांनाच या शिबिराचा फायदा घेता आला नाही.

मंगळवेढा तालुक्यातील येड्रावचे सुपुत्र डॉ.दत्तात्रय पुरुषोतम पाटील यांचे शिक्षण मंगळवेढा, पंढरपूर, पुणे अशा ठिकाणी झालेले असून मरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांनी चार वर्षे वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा दिली आहे.

नंतर शासकीय कोट्यामधून एम डी साठी सातारा येथे निवड झाली. टेस्ट ट्युब बेबी, सोनोग्राफी, गर्भपिशवी तक्रारी संदर्भात स्पेशल ट्रेनिग पूर्ण केले आणि महत्वाचे म्हणजे कोरोना कालवधीत ‘स्त्रीरोग व प्रसुती’ मध्ये सातारा येथे एम.डी मध्ये महाराष्ट्रात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

सध्या ते चैतन्य टेस्ट ट्युब बेबी सेंटर बारामती येथे कार्यरत आहेत परंतु जन्मभूमीत सेवा द्यावी या भावनेने त्यांनी मंगळवेढा येथे मोफत शिबिराचे त्यांनी आयोजन केले.

तब्बल 240 जोडप्यांना याचा फायदा झाला पण वाढलेल्या गर्दीमुळे अनेकांची निराशा देखील झाली. शिबिराची नियोजित वेळ दुपारी ३ वाजेपर्यंत होती पण गर्दीमुळे रात्री आठ वाजेपर्यंत शिबीर सुरूच राहिले.

शिबिरासाठी १४ ते १५ जणांचा ताफा सज्ज होता. पथकातील सर्वच अधिकारी शिबिरात आलेल्या जोडपांची आदराने विचारपूस करीत होते त्यामुळे या शिबिरात एक कौटुंबिक वातावरण तयार झाले होते.

शिबिरार्थीसाठी केळी आणि चहा अशी व्यवस्था देखील करण्यात आली होती
डॉ.पाटील यांनी विविध ठिकाणी अशी शिबिरे आयोजित केली आहेत पण हे शिबीर मात्र रेकॉर्डब्रेक झाल्याची माहिती डॉ.दत्तात्रय पाटील यांनी दिली.

गर्दीमुळे अनेकांना संधी न मिळाल्याने असेच शिबीर पुन्हा लवकरच घेण्यात येणार असल्याची माहितीही डॉ.पाटील यांनी दिली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: वंध्यत्व शिबिर

संबंधित बातम्या

पाणी आमच्या हक्काचं! शेतकऱ्यांच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही; शेटफळे येथे गुरुवारी ३३ वी पाणी संघर्ष परिषद

शेतात पाणी पोहोचेपर्यंत संघर्ष; चळवळीचा लढा थांबणार नाही; मंगळवेढ्यातील पाणी परिषदेत संघर्ष समितीचे शिवाजीराव काळुंगे यांनी दिला नारा

June 27, 2026
मर्चंट नेव्हीतील अधिकार्‍यावर हल्ला; माजी सरपंचासह 5 जणांना पोलिस कोठडी

भक्तांना मोठा धक्का! करणी-बाधा उतरवणारा मंगळवेढ्यातील ‘बिरा महाराज’ निघाला गांजा तस्कर; एनडीपीएस कायद्यान्वये पोलिसांची मोठी कारवाई

June 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

मंगळवेढ्यात खळबळ! फोन नंबरच्या वादातून महिलेचा विनयभंग; एकाच कुटुंबातील ७ जणांवर गुन्हा दाखल

June 25, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

भीमा नदीकाठच्या वीज समस्येवर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई! आमदार समाधान आवताडेंच्या पत्राची तात्काळ दखल; पंढरपूर-मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा

June 24, 2026
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

क्रॅकडाऊन! मंगळवेढ्यात रस्त्यावर आडवी वाहने लावताय? सावधान! थेट पोलिसांत होणार रवानगी; ‘या’ कारवाईने खळबळ

June 24, 2026
धनश्री अर्थकारणाच्या यशस्वी परंपरेचा तीन दिवस दिमाखदार सोहळा; शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थीत संपन्न होणार प्रा.शिवाजीराव काळुंगे सर यांचा अमृतमहोत्सव

दुष्काळाचा बिमोड करण्यासाठी शेतकऱ्यांची वज्रमुठ; मंगळवेढ्यात गाजणार ३४ वी ‘पाणी संघर्ष परिषद; २६ जूनला दुष्काळग्रस्तांचा हुंकार

June 23, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला; प्रारूप आरक्षण जाहीर होताच इच्छुकांची उडाली धावपळ; हरकती नोंदवण्यासाठी अवघे ‘इतके’ दिवस शिल्लक

June 23, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

भयंकर निष्काळजीपणा! डॉक्टरांच्या अनुपस्थितीत नर्सने केली प्रसूती; निष्पाप माता-बाळाचा बळी, चितेच्या राखेत पुरावा

June 22, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

सावधान! मंगळवेढा बस स्टँडवर चोरटे सक्रिय; वृद्धेचे दागिने आणि रोकड लंपास, गुन्हा दाखल; प्रवाशांची सुरक्षा धोक्यात

June 22, 2026
Next Post
मंगळवेढ्यात शैक्षणिक वर्तुळात खळबळ; जुगार खेळतांना शिक्षक सापडला

मंगळवेढ्यात जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा, 75 हजाराचा मुद्देमाल जप्त, अज्ञात चौघांविरूध्द गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

पाणी आमच्या हक्काचं! शेतकऱ्यांच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही; शेटफळे येथे गुरुवारी ३३ वी पाणी संघर्ष परिषद

शेतात पाणी पोहोचेपर्यंत संघर्ष; चळवळीचा लढा थांबणार नाही; मंगळवेढ्यातील पाणी परिषदेत संघर्ष समितीचे शिवाजीराव काळुंगे यांनी दिला नारा

June 27, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महिला शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! जमीन नसतानाही शासकीय योजनांचा लाभ मिळणार

June 27, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; ‘या’ एका कागदपत्राची सक्ती कायमची रद्द; लाखो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

June 27, 2026
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

न्यायालयीन लढा, सारथीच्या योजना अन् कुणबी दाखले; ‘मराठा आरक्षण कक्ष’ सांभाळणार ही ५ महत्त्वाची कामे; सरकारचे मोठे पाऊल; मंत्रालयात स्वतंत्र कक्षाची स्थापना

June 26, 2026
मर्चंट नेव्हीतील अधिकार्‍यावर हल्ला; माजी सरपंचासह 5 जणांना पोलिस कोठडी

भक्तांना मोठा धक्का! करणी-बाधा उतरवणारा मंगळवेढ्यातील ‘बिरा महाराज’ निघाला गांजा तस्कर; एनडीपीएस कायद्यान्वये पोलिसांची मोठी कारवाई

June 26, 2026
मंगळवेढ्यात भव्य ओपन जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचा थरार; ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना मिळणार हक्काचे व्यासपीठ; साप्ताहिक रणयुग टाईम्सचा पुढाकार

मंगळवेढ्यात भव्य ओपन जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचा थरार; ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना मिळणार हक्काचे व्यासपीठ; साप्ताहिक रणयुग टाईम्सचा पुढाकार

June 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा