टीम मंगळवेढा टाइम्स ।
राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाकळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२४-२५ अंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अर्ज करण्याकरिता
आज २६ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली.
कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्य साखळीस चालना देणे
या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी
विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षांत राबविण्यात येत आहे. सन २०२४-२५ मध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी सोयाबीन या पिकाकरिता सदर योजना लक्ष्यांक प्राप्त आहे.
महाडीबीटी पोर्टलवर ३० जुलै २०२४ पासून सदर बाबीच्या टाइल्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत व महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याकरिता आज २६ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
कृषी यांत्रिकीकरण या टाइलअंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येईल. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी ऑनलाइन अर्ज करावेत. व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
१०० टक्के अनुदान.. लाभार्थी निवड ऑनलाइन
मागील खरीप हंगामातील सोयाबीन पेरणी क्षेत्रानुसार जिल्ह्यातील तालुका उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ व बार्शी तालुक्यांना लक्ष्यांक वितरित करण्यात आलेला असून, फक्त याच तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ही योजना लागू आहे.
या योजनेंतर्गत चालू खरीप हंगामामध्ये बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप १०० टक्के अनुदानावर पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाइन अर्जातून ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज