मंगळवेढा टाईम्स ऑनलाइन । मंगळवेढा तालुक्यातील बठाण येथील सरपंच बिभीषण बेदरे,तंटामुक्ती समिती अध्यक्ष संजय बेदरे,ग्रामपंचायत सदस्य विजयकाका शिंदे , अशोक बेदरे,राजूदादा बेदरे,बाळासाहेब रंगनाथ बेदरे,माजी सरपंच संजय बळवंतराव यांच्याकडून बठाण येथे गरजू निराधार व्यक्तींना मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आले.
यामध्ये गहू , तांदूळ , तेल , साखर व इतर एक महिन्याचा किराणा देण्यात आला. सध्या कोरोणामुळे सगळीकडे हाहाकार माजलेला आहे. ज्यांचे पोट हातावरती आहे.अशा मजूर लोकांची सध्या तारांबळ उडत आहे,त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथे अनेकांचं आयुष्य हे मोलमजुरी,उसतोडीवर चालते गावामध्ये पुरेसे काम नाही व सध्या कोरोनामुळं सर्व बंद आहे.
सध्या माणूस जगणं महत्वाचं आहे. सामाजिक भान म्हणून जितकं शक्य आहे तेवढं करायचा प्रयत्न आहे ,असे सरपंच बिभीषण बेदरे यांनी सांगितलं. शिवाय दररोज लोकांना धान्य व किराणा वाटप करणार असल्याचेही बेदरे म्हणाले.
यावेळी प्रभाकर बेदरे,समाधान बाबर ,रामचंद्र भगवान घोडके, कुमार बेदरे, रामदास बेदरे, सुधाकर घोडके , सागर कोडगर, अशोक वसंत बेदरे, राजूदादा सुब्राव बेदरे, बाळासाहेब रंगनाथ बेदरे,ग्रामसेविका श्रीम.संगीता माने ,मंडल अधिकारी जाधव ,तलाठी पुजारी, ज्ञानोबा घोडके श्रीमंत(बापू) भालेराव ,ग्रामपंचायत लिपिक विजयराज भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज