मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । माचणूर (ता.मंगळवेढा) येथे ग्रामस्थांच्या वतीने निराधार , शेतमजूर , दिव्यांग , भूमिहीन , गरजू कुटुंबांना गहू , तांदूळ , साखर , डाळ आदी धान्यासह विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लोकांनी घरीच बसावे , आपल्या कुटुंबाचा बचाव करावा , असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले . या वेळी १० किलो गहू , पाच किलो तांदूळ , दोन किलो साखर , दाळ , तेल आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा प्रत्येकी गरजूंना करण्यात आला . या वेळी सुनील डोके , राजीव बाबर , बबन सरवळे , विठ्ठल डोके , आबासाहेब मेटकरी , तलाठी विनोद बनसोडे , ग्रामसेवक जमीर मुलाणी , संजय कुरवडे आदी उपस्थित होते .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज