मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । स्टेट बँकेने एमसीएलआर वरील व्याजदरात कपात केली आहे . हा दर आता ७ . ७५ टक्क्यांवरून ७. ४० टक्के करण्यात आला आहे.
याचा लाभ लक्षावधी गृहकर्जधारक व इतर कर्जधारकांना होणार आहे . त्याच प्रमाणे बँकेने बचत खात्यावरील रकमेच्या व्याजदरातही कपात केली असून आता हा दर ३ टक्क्यांवरून २ . ७५ टक्के करण्यात आला आहे . नव्या दरांचे क्रियान्वयन १० एप्रिलपासून होणार आहे.
कर्जधारकांना आता काही प्रमाणात कमी मासिक हप्ता भरावा लागणार आहे . इतर बँकाही याचे अनुकरण करण्याची शक्यता आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज