टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी आज गुरुवारपासून सोलापूर जिल्हा परिषद परिसरात व्हिजिटर्सना प्रवेश बंद करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
मुख्यालयातील सर्वच विभागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यात आरोग्य व शिक्षण विभाग आघाडीवर आहेत.
वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्वामी यांनी सांगितले अत्यावश्यक काम व दोन लस घेतल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय कोणालाही मुख्यालयात प्रवेश असणार नाही.
मुख्यालयात असणाऱ्या कार्यालयातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांची ५९ टक्के उपस्थिती असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
ज्या कर्मचाऱ्यांना शुगर, बीपी व इतर गंभीर आजार आहेत. अशांना कामावर बोलवण्यात येऊ नये, असेही विभाग प्रमुखांना सुचित करण्यात आले आहे.
मुख्यालय परिसरातील गर्दी टाळण्यासाठी पोलिस संरक्षण मागविण्यात आल्याचेही यावेळी बोलताना स्वामी म्हणाले.
वर्क फ्रॉम होम
संभाव्य गर्दी टाळण्यासाठी कामासाठी आवश्यक तेवढेच कर्मचारी बोलविण्यात यावेत. कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम करावे. कार्यालयात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनासाठी देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे.
पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही स्वामी यांनी दिला आहे.(स्रोत:पुण्यनगरी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज